शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

साकीनाका बलात्कार प्रकरणी दोषी मोहन चौहानला सुनावली फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 06:40 IST

हत्याप्रकरणी दोषी मोहन चौहानला सुनावली शिक्षा

मुंबई : साकीनाका येथे एका ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी ४५ वर्षीय मोहन चौहान याला सत्र न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा ठोठावली. मध्यरात्री एका टेम्पोमध्ये महिलेवर बलात्कार करून, तिच्या गुप्तांगात लोखंडाची सळई घुसवून तिची हत्या केली होती. 

सप्टेंबर २०२१ मध्ये घटनेने महाराष्ट्र हादरला होता. दिंडोशी न्यायालयाचे न्या. एस. सी. शेंडे यांनी मोहन चौहानला ३० मे रोजी भारतीय दंडसंहिता कलम ३०२ (हत्या), ३७६ (बलात्कार) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत दोषी ठरविले. शिक्षा ठोठावताना कोर्टाने म्हटले की, गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ आहे. महिलेवर निर्घृणपणे हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद स्वीकारत कोर्टाने म्हटले की, आरोपीने जीवघेणा हल्ला करून तिच्या जगण्याची शक्यताच त्याने शिल्लक ठेवली नाही. सळईने वार केल्याने आतडे खराब झाले , होते की, तिची पचनसंस्था नष्ट झाली. ‘हा गुन्हा एका महिलेविरोधातील आहे. विशेषत: एका अनुसूचित जातीच्या महिलेवरील अत्याचार असल्याने तो अधिक गंभीर आहे,’ असा युक्तिवाद सरकारी वकील महेश मुळे यांनी केला. 

दयेची विनंती फेटाळली

चौहान याच्या वकील कल्पना वासकर यांनी त्यला दया दाखविण्याची विनंती केली. ‘चौहानचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी त्याच्यावरच अवलंबून आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. फाशी ठोठावली तर पत्नीला त्रास सहन करावा लागेल’, असे वासकर यांनी सांगितले. मात्र, न्यायालयाने चौहान याला फाशीची शिक्षा ठोठावली.

वाॅचमनचा जबाब

महत्त्वाचा न्यायालयाला सीसीटीव्ही फुटेजही दाखविण्यात आले.  या घटनेत एका इमारतीचा वॉचमन हा महत्त्वाचा साक्षीदार होता. त्यानेच महिलेला जखमी अवस्थेत पाहून पोलिसांना कॉल केला होता. 

कधी घडले ?

१० सप्टेंबर २०२१- महिलेवर लैंगिक अत्याचार११ सप्टेंबर २०२१-  राजावाडी रुग्णालयात उपचार घेत असताना महिलेचा मृत्यू आणि आरोपी मोहनला अटक२८ सप्टेंबर २०२१- मुंबई पोलिसांनी ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल३० मे २०२२- सत्र न्यायालयाने चौहान याला हत्या, बलात्कार व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत दोषी ठरविले२ जून २०२२- फाशीची शिक्षा  ठोठावली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळMumbaiमुंबईCourtन्यायालय