शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Aryan Khan Drug Case: आर्यन खान प्रकरणानंतर मोदी सरकार ड्रगबाबतचा कायदा बदलणार; मोठी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 11:25 IST

NDPSA act: अर्थ मंत्रालयाचा महसूल विभाग बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण आणि जप्ती करणार्‍या कठोर कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे. यात तुरुंगवासाची शिक्षा आणि जबर दंड यांचा समावेश आहे.

केंद्र सरकार आर्यन खान प्रकरणानंतर सावध झाले आहे. खासगी वापरासाठी म्हणजेच नशेसाठी कमी प्रमाणातील ड्रग्जचा वापर हा गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर ठेवण्याचा विचार सुरु आहे. सुत्रांनुसा मंत्रालयांमध्ये सहमती झाली आहे. नारकोटिक, ड्रग्‍स एंड साइकोट्रोपिक सबस्‍टेंसेज ऐक्‍ट, 1985 (NDPSA) च्या कलम 27 मध्ये बदल केले जावेत, असे सर्वांना वाटत आहे. खासकरून पहिल्यांदा ड्रग्ज सापडल्यास तो गुन्हा समजला जाणार नाही. 

ड्रग सेवन करणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी 30 दिवसांसाठी त्याला व्यसन मुक्ती केंद्रात पाठविणे आणि डी अॅडिक्शन प्रोग्राम लाँच केला जाऊ शकतो. याच आठवड्यात यावर बैठक झाली आहे. विविध विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी NDPSA कायद्यातील बदलावर चर्चा केली आहे. 

या नुसार ज्या व्यक्तीकडे ड्रग सापडेल त्याला अटक किंवा गुन्हा दाखल न करता त्याला व्यसन मुक्ती केंद्रात पाठविणे आणि डी अॅडिक्शन प्रोग्राममध्ये भाग घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या चर्चेतील सल्ल्यांवर लवकरच औपचारिक रुप दिले जाण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाचा महसूल विभाग बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण आणि जप्ती करणार्‍या कठोर कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे. यात तुरुंगवासाची शिक्षा आणि जबर दंड यांचा समावेश आहे. एनडीपीएस कायद्याचे नियमन करणाऱ्या वित्त मंत्रालयाने इतर मंत्रालयांनाही चर्चेत समाविष्ट केले आहे. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाव्यतिरिक्त आरोग्य मंत्रालयही ड्रग्जच्या समस्येने त्रस्त आहे.

काय आहेत बदल...सामाजिक न्याय मंत्रालयाने असे सुचवले आहे की अल्प प्रमाणात अमली पदार्थांसह पकडले गेलेले लोक आणि त्यांच्या कुटुंबियांना गुन्हेगार म्हणून नव्हे तर 'पीडित' मानले जावे. प्रस्तावित सुधारणांमध्ये अशा लोकांना तुरूंग किंवा दंडाऐवजी उपचार आणि पुनर्वसन सक्तीचे करण्याचे सुचवण्यात आले आहे. सध्या, NDPS कायद्याच्या कलम 27 नुसार, अंमली पदार्थांच्या वापरास 10,000 रुपयांपर्यंत दंड किंवा सहा महिने कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी