शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मिसिंग मिस्ट्रीचा करुण अंत, माय-लेकाचे अपहरण; मुलाची हत्या, वृद्धेची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 06:33 IST

पाच जणांना अटक, मालमत्ता नावावर करून घेण्यासाठी रोहिणी यांचे अपहरण करून त्यांना आधी राजस्थानात, त्यानंतर गोरेगाव परिसरात डांबून ठेवण्यात आल्याचे समजताच पोलिसांच्या तपास पथकाने तिथे धाव घेतली.

मुंबई - मालमत्तेच्या लोभापोटी माय-लेकाचे अपहरण करून त्यातील मुलाची हत्या करणाऱ्या पाच नराधमांना चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. ५ एप्रिलपासून हे माय-लेक बेपत्ता होते. अखेरीस वृद्धेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले असले तरी मुलाची हत्या केल्याची कबुली पाच जणांनी दिली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ देसाई यांच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

मूळचे कोल्हापूर येथील असलेल्या रोहिणी कांबळे (८०) आणि विशाल कांबळे (४४) या दोघांचे ५ एप्रिल रोजी चेंबूर येथील हॉटेलमधून अपहरण करण्यात आले. कोल्हापुरातील मालमत्तेवरून कोर्ट कचेरी सुरू असल्याने दोघे मुंबईत आले होते. रोहिणी यांच्या बहिणीने दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार २१ एप्रिलला पोलिसांत नोंदवली. त्यानंतर पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरली. २ मे रोजी अखेरीस या बेपत्ता नाट्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. 

निलंबित बेस्ट बसचालक मुनीर पठाण (४१, वडाळा), चालक रोहित अदमाने (४०, पवई), राजू दरवेश (४०, मीरा रोड), केअर टेकर ज्योती वाघमारे (३३, मानखुर्द) आणि प्रणव रामटेके (२५, कोल्हापूर) या पाच जणांनी कांबळे माय-लेकाचे अपहरण केले. रोहिणी कांबळे यांना सुरुवातीला राजस्थानात एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर गोरेगावातील रॉयल पाम ब्लॉक सेक्टरमध्ये ठेवले. दुसरीकडे मुलगा विशाल याला मालमत्ता खरेदी-विक्रीच्या बैठकीसाठी पनवेलला नेऊन एका व्हिलामध्ये हत्या करून  त्याचा मृतदेह बडोदा-अहमदाबाद महामार्गाच्या कडेला फेकून देण्यात आला. कांबळे माय-लेकाची मालमत्ता मिळविण्यासाठी हा कट रचण्यात आल्याची कबुली पाचही जणांनी दिली आहे. तपास सुरू असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. 

रोहिणी बचावल्यामालमत्ता नावावर करून घेण्यासाठी रोहिणी यांचे अपहरण करून त्यांना आधी राजस्थानात, त्यानंतर गोरेगाव परिसरात डांबून ठेवण्यात आल्याचे समजताच पोलिसांच्या तपास पथकाने तिथे धाव घेतली. तिथे रोहिणी यांच्यावर दोघांनी पाळत ठेवली होती. पथकाने त्या दोघांना ताब्यात घेत रोहिणी यांची सुटका केली. डांबून ठेवले असताना रोहिणी यांनी आवाज करू नये, यासाठी त्यांना सतत गुंगीचे औषध दिले जात होते. त्यांना पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला.