शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून पॉर्न व्हिडीओ तयार केला; मिस इंडिया युनिव्हर्सच्या आरोपानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 12:58 IST

राज कुंद्रा प्रकरण ताजं असताना नव्या आरोपामुळे खळबळ

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अश्लिल व्हिडीओ प्रकरणामुळे अडचणीत सापडला असताना आता अशाच प्रकारचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. झारखंडच्या धनबादमध्ये वास्तव्यास असलेल्या मिस इंडिया युनिव्हर्स परी पासवाननं मुंबईतल्या एका प्रोडक्शन कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. प्रोडक्शन कंपनीनं आपल्यासोबत दुष्कृत्य केल्याचा आरोप परी पासवाननं केला. मात्र ती कंपनी कोणाची आहे याबद्दलची माहिती परीला नाही.

मिस इंडिया युनिव्हर्स असलेली परी मॉडेलिंग करते. त्यामुळे ती काम शोधण्यासाठी मुंबईला आली होती. त्याचवेळी तिच्यासोबत भयंकर घटना घडल्याचं तिनं सांगितलं. 'मी काम शोधण्यासाठी मुंबईला गेले होते. एका ठिकाणी कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून माझा अश्लिल व्हिडीओ तयार करण्यात आला. जेव्हा मला याची माहिती मिळाली, तेव्हा मी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस घटनेचा तपास करत आहेत,' असं परीनं सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच परीनं तिचा पती नीरज पासवानविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. हुंड्यासाठी छळ करण्यात येत असल्याचा आरोप तिनं दीर चंदन आणि सासू आशा देवीविरोधात केला होता. परीनं तक्रार दाखल केल्यानंतर नीरजला धनबाद पोलिसांनी अटक केली. नीरजच्या कुटुंबीयांनीदेखील परीवर आरोप केले आहेत. नीरजच्या आधी परीनं आणखी दोन तरुणांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. तिनं २ तरुणांशी विवाह केले असून, त्यांच्या विरोधातही गुन्हे दाखल केले असल्याचा दावा नीरजचा भाऊ चंदननं केला. 

झारखंडच्या गुमलामध्ये वास्तव्यास असलेल्या मॉडेल परीनं २०१९ मध्ये मिस इंडिया युनिव्हर्स खिताब जिंकला. कतराजमध्ये राहणाऱ्या नीरजसोबत तिचा विवाह झाला. पती आणि सासरची मंडळी हुंड्याची मागणी करून त्रास देत असल्याचा आरोप परीनं केला. त्यानंतर तिच्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.