शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोरेगावात ‘मिनी तेलगी’ घोटाळा?; स्टॅम्प पेपरच्या कलर झेरॉक्स वापरत फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 11:14 IST

एप्रिल, २०१९ मध्ये कडेचा यांनी ५० हजाराचा धनादेश रांभीया याला दिला. त्याची पावती मागितल्यावर ती नंतर देतो, असे त्याने सांगितले.

मुंबई :  गोरेगावमध्ये चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत स्टॅम्प पेपरचे कलर झेरॉक्स काढत त्यावर पैशाच्या व्यवहाराचा करार करून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आल्यावर पोलिसांनी नामांकित किराणा स्टोअर नूतन दालमील याचा मालक केतन बाबूभाई रांभीया याला अटक केली. त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात फसलेल्या लोकांनी याला ‘मिनी तेलगी’ घोटाळ्याचे नाव दिले आहे.

गोरेगावच्या एम. जी. रोडवर नूतन दालमिल नावाने किराणा मालाचे दुकान आहे. तक्रारदार अनिता कडेचा या मंडप डेकोरेटर असून, त्यांची मैत्रीण वंदना पटेल आणि मनीष यांच्यामार्फत रांभीया याच्याशी जानेवारी, २०१९ मध्ये त्यांची ओळख झाली. त्या दुकानात किराणा खरेदीसाठी जायच्या. त्यावेळी रांभीया याने त्याचा व्यवसाय वाढविण्यासाठी पैशांची गरज असून,  कडेचा यांना त्याच्याकडे पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. त्यासाठी वर्षाला १५ टक्के परताव्याचेही आमिष दिले. 

एप्रिल, २०१९ मध्ये कडेचा यांनी ५० हजाराचा धनादेश रांभीया याला दिला. त्याची पावती मागितल्यावर ती नंतर देतो, असे त्याने सांगितले. जून, २०१९ मध्ये कडेचा याना रांभीया याने बॉण्ड पेपरवर घेतलेली रक्कम आणि त्यावर १५ टक्के परतावा देईन, असे लिहून सही करत तो पेपर त्यांना दिला. त्यानुसार २०२२ पर्यंत ४१ लाख ५० हजार रांभीया याने कडेचा यांच्याकडून घेतले. त्यांनी जेव्हाही पैशांची मागणी केली तेव्हा पैसे नाहीत किंवा परताव्याचे टक्के वाढवतो, असे सांगितले. मात्र परतावा दिलाच नाही. 

...ही तर सरकारचीही फसवणूक‘बोगस स्टॅम्प पेपर वापरून माझ्या अशिलाकडून लाखो रुपये उकळण्यात आले. ही फक्त त्याचीच नाही, तर एकप्रकारे सरकारचीही फसवणूक आहे. त्यानुसार याविरोधात आम्ही अखेरपर्यंत लढा देणार आहोत. - ॲड. महेश राजपोपट, तक्रारदाराचे वकील

...आणि बिंग फुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक स्टॅम्प पेपरला स्वतःचा असा एक युनिक क्रमांक आणि वॉटरमार्क असतो. सप्टेंबर, २०२१ रोजी जेव्हा कडेचा यांनी रांभीया याने त्यांना दिलेले सहा बॉण्ड पेपर बारकाईने पाहिले, त्यावेळी त्यांना सगळ्यांवर ३३४१८४ हा एकच युनिक क्रमांक दिसला. याबाबत त्यांनी रांभीया याला याबाबत विचारणा केली. ज्यावर भेटून बोलू, असे तो म्हणाला. अखेर कडेचा यांनी याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रांभीया याच्याविरोधात फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केल्यावर गुरुवारी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी गोरेगाव पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी