शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घर सांभाळण्यासाठी मुलींना जुंपले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 07:15 IST

शिक्षण अर्ध्यावरच : कोरोना साथीचा फटका; भारतासह अन्य आशियाई देशांमधील विदारक चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतासह आशियाई देशांतल्या ग्रामीण भागात कोरोना साथीमुळे गरीब घरांतील लाखो मुलींना शिक्षण अर्धवट सोडून पैसे कमावण्यासाठी कामाला जुंपून घेण्याची वेळ आली आहे. ‘रूम टू रिड’ या संस्थेने भारतासह काही देशांमध्ये यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

भारत, बांगलादेश, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका अशा अनेक देशांतील सुमारे २८ हजार मुलींची या सर्वेक्षणासाठी मते जाणून घेण्यात आली. रुढीप्रियतेमुळे या देशांत आधीच मुलींच्या शिक्षणाबाबत तितकीशी आस्था दिसून येत नाही. कोरोना साथीमुळे अनेक देशांतील शाळा सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळांनी आॅनलाइनद्वारे शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र आशियाई देशांतल्या ग्रामीण भागात ज्या गरीब मुलींकडे इंटरनेट तसेच मोबाइलची सुविधा नाही त्यांचे तर शिक्षणच थांबले आहे. शाळा बंद झाल्याने त्या मुलींचे तेथून नाव काढून त्यांना घरकामाला जुंपण्यात येत आहे.

समिती आज चौकशी करणारया प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सोमवारी जिल्हा बालकल्याण समिती उपस्थित राहणार आहे. त्या वेळी कागदपत्रांची तपासणी करून मुलाचा ताबा देणे तसेच गुन्हा नोंद करण्याबाबत कार्यवाही होणार आहे.रूढीवादी विचारांचा अद्यापही पगडा‘रूम टू रिड’ या संस्थेचे संस्थापक जॉन वूड यांनी या पाहणीनंतर सांगितले की, जेव्हा पालकांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही, तेव्हा साधारणपणे ते मुलांना शिकू देतात व मुलींना शिक्षण अर्धवट सोडायला लावतात. विकसनशील देशांमध्ये रुजलेले रुढीवादी विचार तसेच गरीब कुटुंबांची आर्थिक ओढाताण यामुळे मुलींच्या शिक्षणावर सर्वात आधी गदा येते. कोरोना साथीच्या काळात काही देशांमध्ये शालेय शिक्षणाची घडी विस्कटली आहे. आॅनलाइन शिक्षण दिले जात असले, तरी त्यासाठी साधने सर्वांकडेच नसल्याने अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणाला पारखे होत आहेत. त्यात मुलींचे प्रमाण मोठे आहे.या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २८ हजार मुलींपैकी ४२ टक्के मुलींच्या कुटुंबांचे उत्पन्न कोरोना साथीमुळे खालावलेले आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी मुली शिक्षण अर्धवट सोडून पैसे कमाविण्यासाठी छोटेमोठे काम करत आहेत. या सर्वेक्षणातील दर दोनपैकी एक मुलगी शिक्षण अर्धवट सोडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Labourकामगार