शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्टसाठी आले लाखोंचे हेरॉइन! एकाला अटक, राजस्थानमधून अमली पदार्थ विक्रीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 08:35 IST

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने राजस्थानमधून अमली पदार्थ आणले होते. शेख याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : थर्टी फर्स्टला आयोजित एका कार्यक्रमात विकण्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांचे हेरॉइन मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांकडून सोहेल अहमद शेख (३५) नामक  बाउन्सरला अटक करण्यात आली आहे. 

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने राजस्थानमधून अमली पदार्थ आणले होते. शेख याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. शेख याला सहायक पोलिस निरीक्षक नीलेश साळुंखे आणि त्यांच्या पथकाने रविवारी रात्री मालवणी येथील मोहम्मद रफिक मैदानाजवळ पकडले. पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील कारवाई दरम्यान संशयास्पदपणे बॅग घेऊन जात असताना शेख आढळला होता. वरिष्ठ निरीक्षक शेखर भालेराव यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत तो एका खासगी एजन्सीशी संलग्न असून पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांना ड्रग्ज देत असल्याचे उघड झाले. 

असा सापडला जाळ्यात सोहेल अहमद शेख गेल्या आठवड्यात हेरॉइन घेऊन मुंबईत आला आणि पार्ट्यांच्या ऑर्डर घेत होता. मात्र ग्राहकाची  वाट पाहत असताना तो जाळ्यात सापडला. मालवणीत आठवडाभरातील ही दुसरी मोठी अटक आहे. बुधवारी, कांदिवलीच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे १.१२ कोटी रुपयांच्या २८० ग्रॅम हेरॉइनसह एका आरोपीला अटक केली.

नोकरी गमावल्याने लागला वाईट मार्गाला काही महिन्यांपूर्वी, सोहेल अहमद शेख याने नोकरी गमावली. त्याला उदरनिर्वाह करणे कठीण झाले. त्यानंतर त्याचा मित्र आणि तो राजस्थानला गेला, तेथे तो एका ड्रग्ज तस्कराला भेटला आणि पार्ट्यांमध्ये विकण्यासाठी ड्रग्जची मागणी केली.  व्यापाऱ्याचा शेखवर विश्वास होता आणि त्याने त्याला एक पैसाही न घेता अमली पदार्थ दिले, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ