शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मध्यरात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर गँगरेप; घटना समजताच पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 09:00 IST

कॉलनंतर तातडीने जीआरपी आणि रेल्वे पोलिसचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी पीडित महिलेने संपूर्ण प्रकरण सांगितले.

नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर सामुहिक बलात्काराची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना प्लॅटफॉर्मवरच झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एका महिलेवर दोघांनी अतिप्रसंग केला. या घटनेत आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यातील २ आरोपी मुख्य आरोपींना साथ देणारे आहेत. हे चारही जण रेल्वेचे कर्मचारी आहेत. 

सूत्रांनुसार, पीडित महिलेचे वय २८-३० मधील आहे. आरोपींपैकी एकाशी महिलेसोबत ओळख झाली होती. गुरुवारी-शुक्रवारी रात्री त्या आरोपीने पीडित महिलेला बहाणा करून रेल्वे स्टेशनवर भेटण्यास बोलावले. त्यानंतर आरोपींनी तिला नवी दिल्ली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ८-९ वर असलेल्या एका खोलीत घेऊन गेले. या खोलीचा वापर फुटओव्हर ब्रीजखाली असलेल्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आणि अन्य कामासाठी होत होता. त्यात काही सामानही होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने त्याठिकाणी अन्य तीन जणांना बोलावले होते. हे सर्व आरोपी नशेत होते. ज्यांनी या महिलेला धमकावत तिच्यावर गँगरेप केला. या घटनेत २ आरोपींचा थेट संबंध असून इतर दोघांनी गुन्हेगारांची मदत केल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री १२.३० ते १.३० दरम्यान ही घटना घडली. पीडित महिलेला त्याच अवस्थेत टाकून चौघांनीही तिथून पळ काढला. त्यानंतर पीडित महिलेने मध्यरात्री २.३० वाजता पीसीआर कॉल केला. रेल्वे स्टेशनवर गँगरेप झाल्याच्या घटनेने पोलीस अधिकारी हादरले. 

कॉलनंतर तातडीने जीआरपी आणि रेल्वे पोलिसचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी पीडित महिलेने संपूर्ण प्रकरण सांगितले. हा गँगरेप करणाऱ्यांमध्ये मुख्य आरोपी रेल्वेचा कर्मचारी असल्याचं जीआरपीला कळालं. त्यानंतर नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पोलिसांनी तपास करत मुख्य आरोपीला जेरबंद केले. त्याची चौकशी केल्यानंतर इतर ३ आरोपींनाही अटक करण्यात आली. पकडलेले सर्व आरोपी हे रेल्वे कर्मचारी आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. हे चारही आरोपी नशेत होते. ते रेल्वेच्या इलेक्ट्रिक डिपार्टमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली