शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाची रूम नाही, पण ११.८५ लाखांचा चुना लागला, तक्रारदाराला आरोपींनी तीन प्रकल्प फिरवले

By गौरी टेंबकर | Updated: September 4, 2023 12:20 IST

दहिसर पोलिसांनी त्रिकुटावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मुंबई: बोरिवलीत म्हाडाचे घर मिळवून देण्याचे सांगत विश्वास संपादन करून ११.८५ लाखांचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. आरोपींनी तक्रारदाराला तीन वेगवेगळ्या प्रकल्पाजवळ फिरवले मात्र रूम काही मिळाली नाही. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी त्रिकुटावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

तक्रारदार शर्मिला गोहिल (४०) या दहिसर पूर्व परिसरात दोन मुलांसह राहत असून त्यांचे पती कपडे शिवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गोविंद यांची २०१५ मध्ये दिनेश जेठवा या मित्रामुळे संजय प्रजापती, राकेश मोरे आणि भानू गुप्ता या आरोपी सोबत ओळख झाली. प्रजापतीची म्हाडा कार्यालयात चांगली ओळख असून तो म्हाडाची रूम मिळवून देईल असे  त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार बोरिवलीमध्ये अशोकवनची मध्यम उत्पन्न गटातील खोली प्रजापती मिळवून देणार होता.

ज्याची किंमत ही १२ लाख ८५ हजार स्टॅम्प ड्युटीसह सांगण्यात आली. तसेच काम झाल्यावर ५ लाख रुपये कमीशन घेणार असल्याचेही त्याने नक्की केले. त्याच्या सांगण्यानुसार गोहिलनी म्हाडाचा अर्ज भरला. त्यानंतर हे टोळके गोहिलना वांद्रेच्या म्हाडा कार्यालयात घेऊन गेले आणि तिथे कुलकर्णी नावाच्या व्यक्तीशी म्हाडा अधिकारी म्हणून भेट घालून देत तोच घराचे काम करणार असल्याचे त्यांना सांगितले. प्रजापतीने गोहिलकडून ३ लाख २० हजार रुपये उकळले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी या त्रिकुटाने त्यांच्याकडून ११.८५ लाख घेतले मात्र त्यांना घर काही लागले नाही. याप्रकरणी दहिसर पोलिसात त्यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला.

म्हाडाचा बनावट शिक्का व खोट्या रिसीप्ट!आरोपींनी तक्रारदाराला पैसे भरल्याच्या बनावट रीसिप्ट दिल्या. ज्यात मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, मुंबई (मिळकत व्यवस्थापक) असा शिक्का आणि सही मात्र तारीख मे २००९ ची करण्यात आली होती. त्यावर विचारणा केल्यावर जुना प्रकल्प असल्याने जुन्या पावत्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

ते ऑफर लेटर आमचे नाहीच... गोहिल यांना आरोपींनी २०१६ मध्ये त्यांच्या नावाचे म्हाडाच्या लेटरहेडवर असलेले देकार पत्र (ऑफर लेटर) दिले. ते घेऊन जेव्हा तक्रारदारांनी म्हाडा कार्यालयात चौकशी केली तेव्हा असे कोणतेही पत्र आम्ही दिलेच नसल्याचे अधिकारी म्हणाले.

म्हणे नव्या प्रकल्पात रूम देतोखोट्या ऑफर लेटरचा प्रकार उघड झाल्यावर गोहिलने प्रजापतीकडे पैसे परत मागितले. त्यावर शिंपोलीमध्ये म्हाडाच्या नवा प्रकल्पात तुम्हाला घर घेऊन देतो असे सांगत त्याने २ लाख घेतले. त्याचेही ताबापत्र बनावट निघाल्यावर मागाठाणे येथील म्हाडाच्या इमारतीमधील खोली दाखवल्याने तक्रारदाराने पैसे परत मागितले. ज्यावर त्यांना बाऊन्स चेक दिले गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी