शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गतिमंद पीडित तरुणीनं पँट उलटी घातली अन् बलात्काराला वाचा फुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 12:09 IST

गतिमंदपणातून आठ दिवसांत बरे करतो, असा बहाणा करून २२ वर्षीय तरुणीवर मांत्रिकाने अत्याचार केल्याची घटना शिरूर तालुक्यात पाच वर्षांपूर्वी घडली होती.

बीड : गतिमंदपणातून आठ दिवसांत बरे करतो, असा बहाणा करून २२ वर्षीय तरुणीवर मांत्रिकाने अत्याचार केल्याची घटना शिरूर तालुक्यात पाच वर्षांपूर्वी घडली होती. याप्रकरणी गुरुवारी येथील अतिरिक्त सत्र न्या. के. आर. पाटील यांनी आरोपीला दोषी ठरवून आठ वर्षांची सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दिलीप वामन रोकडे (५७) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.  २३ मार्च २०१६ रोजी दिलीप रोकडे याने पीडितेच्या आईची वस्तीवर जाऊन भेट घेतली. तुमच्या मतिमंद मुलीला आठ दिवसांत नीट करतो, असे सांगून त्याने विश्वास संपादन केला. त्याच्यावर विश्वास ठेवून दुसऱ्या दिवशी २४ मार्च २०१६ रोजी पीडितेला घेऊन आई त्याच्याकडे गेली. त्यावेळी त्याने अंगावरून लिंबू कापून टाकण्याच्या बहाण्याने पीडितेला ओढ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून शिरूर ठाण्यात दिलीप रोकडेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.  उलटी पॅन्ट घातल्याने गुन्ह्याला वाचापीडितेला घेऊन आरोपी ओढ्याच्या बाहेर आला. त्यानंतर मायलेकी घरी आल्या. मात्र, मुलीच्या अंगातील पॅन्ट उलटी घातलेली आईला आढळली. तिने याबाबत मुलीकडे चौकशी केली, तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला घृणास्पद प्रकार सांगितला.