शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

"पप्पा, ड्रममध्ये आहेत..."; शेजाऱ्यांना सांगायची चिमुकली लेक; मजुरांना 'असा' सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:25 IST

मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभ राजपूत याच्या निर्घृण हत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

मेरठमध्ये मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभ राजपूत याच्या निर्घृण हत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याच्या कुटुंबाने त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सौरभची आई रेणू देवी यांचा आरोप आहे की, मुस्कानने तिच्या पतीची हत्या केली, नंतर त्याचा मृतदेह एका खोलीत ठेवला आणि जणू काही घडलंच नाही अशा पद्धतीने ती फिरत राहिली.

सौरभ ४ मार्चपासून बेपत्ता होता. मुस्कानच्या भाड्याच्या घरातून जड ड्रम काढण्यासाठी मजुरांना बोलावण्यात आलं तेव्हा हा भयंकर गुन्हा उघडकीस आला. जेव्हा मजुरांना ड्रम वजनाने जड असल्याचं आढळलं तेव्हा त्यांनी मुस्कानला त्याबद्दल विचारलं. तिने सहज सांगितलं की त्यामध्ये घरातील कचरा आहे, पण जेव्हा मजुरांनी ड्रम हलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा झाकण उघडलं आणि आतून एक दुर्गंधी येऊ लागली. संशय आल्यावर मजुरांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

"पप्पा, ड्रममध्ये आहेत..."

तपासात असं दिसून आलं की, मुस्कान आणि साहिल यांनी मिळून सौरभची चाकूने वार करून हत्या केली, नंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये लपवले. घरमालकाने मुस्कानला घर रिकामं करण्यास सांगितलं होतं, तेव्हाच तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन केला. रेणू देवी म्हणाल्या की, कदाचित सौरभच्या लेकीलाही याबद्दल माहिती असेल. पप्पांना ड्रममध्ये ठेवण्यात आलं आहे असं तिने शेजाऱ्यांना सांगितलं होतं. हे ऐकून कुटुंबाला आणखी धक्का बसला.

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मृतदेह सापडल्यानंतर, मुस्कान तिच्या माहेरी पळून गेली. तिने संपूर्ण घटना तिच्या पालकांना आधीच सांगितली होती. सौरभची आई म्हणते की, मुस्कानचं कुटुंब हे हत्या लपवण्याचा प्रयत्न करत होते, पण पोलिसांनी त्यांना पकडलं. मंगळवारी पोलिसांनी मुस्कान आणि साहिल या दोघांना अटक केली आणि बुधवारी न्यायालयात हजर केलं, जिथे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

तांत्रिक चिन्हं, भोलेनाथ अन् इंग्रजी वाक्य... सौरभची हत्या करणाऱ्या साहिलच्या घरात दडलीत रहस्य

सौरभची हत्या ही एक सामान्य घटना नव्हती तर एक क्रूर हत्या होती. ज्यामध्ये प्रेम, फसवणूक, तंत्र-मंत्र आणि काळी जादू यांचं भयानक मिश्रण होतं. सौरभ, एक साधा तरुण होता, ज्याने कधीही कल्पना केली नसेल की त्याची पत्नीच त्याचा काटा काढेल. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे साहिलचं घर. ज्याच्या भिंती सामान्य नाहीत. भिंतींवर विचित्र गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. काळ्या जादूमध्ये अडकलेल्या,भयंकर, धोकादायक माणसाची मनोवृत्ती यातून दिसून येत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी