शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईला एमडीची क्रेझ; ११ महिन्यांत ४९२८ कोटींचे ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 07:09 IST

एकूण कारवाईतून ड्रग्जमध्ये घातक समजल्या जाणाऱ्या एमडीकडे तरुणाईचा वाढता कल चिंताजनक असल्याचे एएनसीचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी सांगितले. 

 लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या ११ महिन्यांत अंमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक रेकॉर्डब्रेक कारवाई करत ४ हजार ९२८ कोटी रुपये मूल्याचा ४ हजार ३६ किलो ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत जप्त केलेल्यात एमडीचे प्रमाण ६१ टक्के तर, गांजा ३० आणि कोडीन मिश्रित कफ सिरपचा ८ टक्के साठा आहे.  एकूण कारवाईतून ड्रग्जमध्ये घातक समजल्या जाणाऱ्या एमडीकडे तरुणाईचा वाढता कल चिंताजनक असल्याचे एएनसीचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी सांगितले. 

 ५ वर्षांत १४६   आफ्रिकन जाळ्यात 

गेल्या पाच वर्षांत १४६ आफ्रिकन ड्रग्ज तस्करांवर कारवाई करत त्यांच्याकडून ६० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. 

ड्रग्जचे सेवन करणाऱ्यावर कारवाईचा वेग कोरोनाकाळ वगळता ड्रग्जचे सेवन करणाऱ्यावर वर्षाला ७ ते ८ हजार गुन्हे दाखल होतात. यावर्षी गेल्या ११ महिन्यांत ९ हजार २३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ४ हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आतापर्यंत जवळपास २१ शाळांमध्ये ४ हजार विद्यार्थ्यांसह ६५ शिक्षकांना ‘ड्रग्जला नाही म्हणा’ मोहिमेअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनमुक्ती केंद्राचा अभावकारवाईबरोबरच ड्रग्जच्या जाळ्यात गुरफटत चाललेल्या तरुणाईसाठीचे व्यसनमुक्ती केंद्राचाही अभाव असल्याची खंत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.  

मुंबईला ड्रग्ज फ्री करण्यासाठी एएनसीकडून कारवाई बरोबर जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. यासोबत डार्कवेबवरील ड्रग्जच्या खरेदी व्यवहारांबरोबर त्यावर  नियंत्रण आणण्याचे आव्हान आहे. - प्रकाश जाधव, उपायुक्त, एएनसी, मुंबई 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ