शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महापौर गोळीबार ! मुंबईचे तज्ज्ञ तपासत आहेत गोळीबाराचे आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 23:42 IST

महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील गुंतागुंत उलगडून काढण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील प्रोफेशन सायबर तज्ज्ञांची चमू नागपुरात बोलवून घेतली आहे.

ठळक मुद्देफोन कॉल्स आणि सीसीटीव्ही फुटेजची सांगड : गुंतागुंत सोडविण्यासाठी सुरू आहे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील गुंतागुंत उलगडून काढण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील प्रोफेशन सायबर तज्ज्ञांची चमू नागपुरात बोलवून घेतली आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी गोळा केलेल्या फोन कॉल्स आणि सीसीटीव्ही फुटेजचा डाटा या चमूने आपल्या पद्धतीने तपासणे सुरू केले आहे. दुसरीकडे मंगळवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने भाजपाच्या एका निलंबित पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याचे जोरदार वृत्त शहरात पसरले. या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरी पोलिसांनी मात्र अधिकृत माहिती देण्याऐवजी मौन धारण करणे पसंत केल्यामुळे वृत्त खरे की खोटे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.१७ डिसेंबरला लग्नाचा वाढदिवस असल्याने कौटुंबिक मित्रपरिवारासह जोशी वर्धा मार्गावरील एका ढाब्यावर जेवण करायला गेले होते. मध्यरात्री तेथून परत येत असताना त्यांच्या वाहनावर दुचाकीवर आलेल्या आरोपींनी तीन गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. हिवाळी अधिवेशन सुरू असताना ही घटना घडल्याने सरकारने त्याची गंभीर दखल घेत पोलिसांकडून घटनेची माहिती जाणून घेतली आणि तातडीने आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या गुन्ह्याचा तपास तडकाफडकी गुन्हे शाखेकडे सोपविला होता. अनेक ठाणेदारांचीही याकामी मदत घेण्यात आली. मात्र, आता एक महिना होत आला असूनही गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.विशेष म्हणजे, पोलिसांनी आतापावेतो ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोठ्या प्रमाणात फोन कॉल्सचा डाटा संकलित केला आहे. त्याची सांगड घालून गोळीबाराचे आरोपी शोधण्यासाठी स्थानिक पोलीस प्रयत्न करीत होते. पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात काही महत्त्वाचे धागे हाती लागले. मात्र, गोळीबाराचे आरोपी निष्पन्न करण्याएवढे ते मजबूत नसल्याने वरिष्ठांनी आपल्या मदतीसाठी मुंबईहून सायबर तज्ज्ञांची चमू नागपुरात बोलवून घेतली आहे. ही चमू गोळीबाराचा उलगडा करण्यासाठी कामी लागली आहे.या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने भाजपाच्या एका निलंबित पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याचे जोरदार वृत्त शहरात पसरले. या वृत्ताने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. प्रत्येक जण एकमेकांना या संबंधाने विचारणा करीत होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र याबाबत बोलण्याचे टाळत होते. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्याकडे या संबंधाने चौकशी करण्यासाठी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांची बोलण्याचे टाळले. तर, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे यांनी कुणाचे नाव घेणे योग्य नाही मात्र आम्ही अनेकांची चौकशी केली. आजही काही जणांना या संबंधाने विचारपूस केल्याचे ते म्हणाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती देण्याचे टाळल्यामुळे भाजपाच्या निलंबित पदाधिकाऱ्याच्या चौकशीचे वृत्त खरे की खोटे, ते स्पष्ट झाले नाही.तपास लावणारच : आयुक्तया गुन्ह्याचा तपास शहर पोलिसांसाठी आव्हान नव्हे तर प्रतिष्ठेचा विषय ठरल्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गेल्या आठवड्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. आजही त्यांनी गोळीबाराचा छडा आम्ही लावणारच, असे म्हटले. तपासात प्रगती आहे. त्यामुळे कुणाचे नाव घेणे योग्य ठरत नसल्याचेही डॉ. उपाध्याय म्हणाले.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीFiringगोळीबार