शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस चिनी कंपन्यांच्या मास्टरमाइंडला अटक; भारताबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 09:40 IST

दोर्तसे हा जिलियन इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळावर होता. आपण हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील रहिवासी आहोत, असे त्याने कंपनीच्या कागदपत्रांमध्ये नमूद केले होते.

नवी दिल्ली : भारतामध्ये चिनी लागेबांधे असलेल्या बनावट कंपन्या सुरू करणाऱ्या व त्यांना तोतया संचालक पुरविण्याच्या गैरकृत्यांचा मास्टरमाइंड दोर्तसे याला सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसच्या  तपास पथकाने शनिवारी अटक केली. दोर्तसे हा बिहारमधील गयामार्गे देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक केली. कर्ज देणाऱ्या ॲपचा सुळसुळाट झाला आहे. यातून लोकांची पिळवणूक होत असल्याच्या, कर्जवसुलीसाठी त्यांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली. 

जिलिअन हाँगकाँग लिमिटेड या कंपनीची उपकंपनी असलेल्या जिलियन कन्सल्टंट्स इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या गुरगाव येथील तर फिनिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या बंगळुरूमधील व हसीस कन्सल्टिंग लिमिटेड या कंपनीच्या हैदराबाद येथील कार्यालयांवर केंद्रीय यंत्रणांच्या तपास पथकांनी नुकतेच छापे टाकले. त्यातून देशात बनावट चिनी कंपन्या सुरू करण्यामागे दोर्तसे हाच मास्टरमाइंड असल्याचे स्पष्ट झाले. 

खोटी कागदपत्रेदोर्तसे हा जिलियन इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळावर होता. आपण हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील रहिवासी आहोत, असे त्याने कंपनीच्या कागदपत्रांमध्ये नमूद केले होते. ही सर्व माहिती खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र दोर्तसे हा भारतात कसा आला, त्याने चीनशी संबंधित बनावट कंपन्या कोणाच्या संगनमताने सुरू केल्या, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. 

चिन्यांच्या संपर्कातॲपद्वारे कर्ज देणाऱ्या बनावट कंपन्यांचे भारतातील कर्मचारी एका मेसेजिंग ॲपद्वारे आपल्या चिनी भागीदारांच्या संपर्कात होते. हसीस ही कंपनी व जिलिआन हाँगकाँग लिमिटेड या कंपनीशी संगनमत होते, असेही केंद्रीय यंत्रणांच्या तपासात आढळून आले आहे. बनावट चिनी कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्यानंतर दोर्तसे याने दिल्ली एनसीआर परिसरातून पलायन केले होते व तो देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात होता. 

३३ कंपन्यांच्या चौकशीचे आदेश जिलियन कन्सल्टंट्स  इंडिया प्रा. लि. व अन्य ३२ कंपन्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय कॉर्पोरेट घडामोडीविषयक खात्यानेदिले आहेत. त्यामध्ये चीनशी लागेबांधे असलेल्या बहुतांश कंपन्या आहेत. भारतात बनावट चिनी कंपन्यांमार्फत जे संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार चालतात, त्यांमध्ये या कंपन्यांचा हात असल्याचे काही पुरावे तपास यंत्रणांना मिळाले आहेत.