शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

Mansukh Hiren Death: सचिन वाझे बनावट नावानं ‘पंचतारांकित’मध्ये! 'त्या' २ बॅगेमध्ये काय? तपासाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 05:58 IST

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण - वाझे याने एस. एस. गावडे या नावाच्या आधारकार्डचा हवाला देऊन हॉटेलात मुक्काम केला. त्या कार्डवर त्याचा फोटो होता. त्यामुळे त्याने बनावट कार्डही बनविली असल्याचे उघड झाल्याचे सांगण्यात आले.

मुंबई : स्फोटक कार प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझेकडील तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान तो हॉटेल ट्रायडन्टमध्ये बनावट नावाने वास्तव्याला होता. या काळात त्याने अनेकांशी भेट घेतल्याचे समजते. तपास अधिकाऱ्यांनी हॉटेल व तो उतरलेल्या रूमच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व   हॉटेलमधील  नोंदी  ताब्यात घेतल्या आहेत.

वाझे याने एस. एस. गावडे या नावाच्या आधारकार्डचा हवाला देऊन हॉटेलात मुक्काम केला. त्या कार्डवर त्याचा फोटो होता. त्यामुळे त्याने बनावट कार्डही बनविली असल्याचे उघड झाल्याचे सांगण्यात आले. वाझे १६ तारखेला इनोव्हातून हॉटेलमध्ये आला होता. त्याच्याकडे दोन बॅगा होत्या. त्यामध्ये रोकडसह अन्य काही कागदपत्रे असावीत असा संशय आहे. २० तारखेला त्याने रूम सोडल्यानंतर दुसऱ्या एका कारमधून निघून गेल्याची माहिती आहे. त्याने खोटे नाव का वापरले, त्याने अँटिलियाच्या परिसरात जिलेटीनच्या कांड्या असलेली स्काॅर्पिओ ठेवण्याचा कट रचला का, चार दिवसांच्या वास्तव्यात त्याने काय केले, कोणाशी भेटीगाठी घेतल्या, याबाबत माहिती घेतली जात आहे.

१४ सिमकार्ड पुरविणारा गुजरातमधून ताब्यात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, गुजरातहून १४ सिमकार्ड पुरविणाऱ्या व्यक्तीला राज्य दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे याप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे. हिरेन मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आल्याचा दावा एटीएसने केला. यात वाझे हा मुख्य आरोपी असून, त्याच्या दोन साथीदारांंना रविवारी अटक केली. 

दिल्लीहून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकएटीएसने हिरेन मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळविले. त्यामध्ये वाझेचा ताबा मागितला आहे. त्यामुळे एनआयए स्फोटक प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करणे व हत्येचा गुन्हा घेण्यास हालचाली सुरू केल्या. त्याबाबत तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरण