शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

...म्हणे मी भगवान शंकरापासून घेतली प्रेरणा; तरुणानं घरात भलताच कारनामा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 17:58 IST

पोलिसांनी केली तरुणाला अटक; व्हिलामध्ये करायचा गांजाची शेती

बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूत एका ३५ वर्षीय इराणी नागरिकाला क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. बिदादी परिसरात असलेल्या एका व्हिलामधून पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या. जवाद रोस्तमपूर असं तरुणाचं नाव असून २०१० मध्ये तो शिक्षणासाठी बंगळुरूत आला होता. एमबीए पूर्ण केलेल्या जवादनं घरात केलेला कारनामा पाहून पोलिसांना धक्का बसला. 

बिदादीजवळ असलेल्या कम्मनहलीमध्ये एका व्हिलामध्ये राहणाऱ्या जवादनं हाइड्रोपोनिक मॉडेलचा वापर करत भांगेची शेती केली. भगवान शंकराचा प्रभाव आपल्यावर असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. गेल्या ३ वर्षांपासून तो अंमली पदार्थांचं सेवन करत आहे. याशिवाय मित्रांना अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याचं कामदेखील करतो.

जवादनं भांगेबद्दल सहा महिन्यांहून अधिक काळ संशोधन केलं. उत्पादन कसं घ्यायचं, ते घेताना काय काळजी घ्यायचे याची माहिती त्यानं ऑनलाईन गोळा केली. लॉकडाऊनच्या काळात त्यानं भांग आणि पुदिना उगवण्याचा निर्णय घेतला. भांगेचं उत्पादन घेण्यासाठी त्यानं हाइड्रोपोनिक मॉडेल तयार केलं. त्यानं युरोपच्या डार्क वेबच्या माध्यमातून ६० बियाणं मागवली. पहिलं बियाणं त्यानं फिश टँकमध्ये लावलं.

जवादनं घरच्या घरी गांजाचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यानं रोपट्यांची उत्तम काळजी घेतल्याचं क्राईम ब्रांचचे अधिकारी संदीप पाटील यांनी सांगितलं. यामध्ये जवादला त्याच्या मित्रांनी मदत केली. त्यांनी एकूण १३० रोपटी उगवली. एक ग्रॅम गांजाची किंमत ३ ते ४ हजार होती. एलईडी लाईट्स आणि रसायनांच्या मदतीनं जवादनं गांजाची शेती केली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ