शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

...म्हणून त्याने बंदुकीने ‘तिच्या’ पिलाला ठार मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 09:07 IST

मांजरीने कोंबडीच्या पिलाची शिकार केल्याने हेमराज सोनवणे याने बंदुकीने गोळी झाडत मांजरीच्या पिलास ठार केल्याची घटना गुरुवारी जिजाऊ नगरात घडली. पोलिसांनी हेमराज याला बंदुकीसह ताब्यात घेतले आहे.

जळगाव :  मांजरीने कोंबडीच्या पिलाची शिकार केल्याने हेमराज सोनवणे याने बंदुकीने गोळी झाडत मांजरीच्या पिलास ठार केल्याची घटना गुरुवारी जिजाऊ नगरात घडली. पोलिसांनी हेमराज याला बंदुकीसह ताब्यात घेतले आहे.पुष्पराज प्रमोद बाणाईत या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराशेजारी हेमराज सोनवणे हा फोटोग्राफर वास्तव्याला आहे. त्याने कोंबड्या पाळल्या आहेत. गुरुवारी दुपारी  बाणाईत यांच्या मांजरीने हेमराजच्या कोंबडीच्या पिलाची शिकार केली. त्यामुळे चिडलेल्या हेमराजने घरातून बंदूक आणून मांजरीचा शोध घेतला. मात्र, मांजरीऐवजी तिचे पिलू दिसले. त्याने बंदुकीतून गोळी झाडून मांजरीच्या पिलाला ठार केले.मी तसाच आहे...या घटनेनंतर पुष्पराज व त्याची आई सुरेखा यांनी हेमराज याला मुक्या प्राण्याला का ठार मारले. तू नेहमीच असा त्रास देतो, तुझ्या अनेक चुकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असे बोलत असताना, मी तसाच आहे, दुसऱ्या मांजरीलाही मारणार आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, असे हेमराज याने हसत- हसतच उर्मटपणे उत्तर दिले. त्यानंतर पुष्पराज याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.