शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने केली प्रेयसीच्या मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 10:20 IST

Crime News : प्रियकराने प्रेयसीच्या आठ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

तेल्हारा: स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाडी अदमपूर येथे प्रियकराने प्रेयसीच्या आठ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणात मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीस अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय श्यामराव नवलकर (३२) यास दोन अपत्ये असून, तो पत्नीविना राहत होता. तर फिर्यादी सोनाली राजू कुमरे (३०) हिला दोन अपत्ये असून, ती पतीविना राहत होती. आरोपी संजय व फिर्यादी सोनाली हे दोघेही एका कारखान्यात काम करीत असताना दोघांचे सूत जुळले होते. त्यामुळे आरोपी संजय व फिर्यादी सोनाली हे दोघेही वाडी अदमपूर येथे सोबत राहत होते. फिर्यादी सोनालीला मुलगा वेदांत व एक मुलगी श्रावणी असे दोन अपत्ये आहेत. मृतक वेदांत (८) याने पिण्याच्या पाण्याच्या माठात ग्लास बुडविल्याच्या कारणावरून आरोपी संजय नवलकर याने लाकडाच्या साहाय्याने मारहाण करू लागला. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी त्याची बहीण श्रावणी गेली असता, तिला देखील काठीने मारून जखमी केले. त्यानंतर आरोपी संजय नवलकर याने वेदांच्या छातीवर दगड ठेवून त्याची हत्या केली. तसेच फिर्यादी सोनाली राजू कुमरे हिला जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी सोनाली कुमरे हिने तेल्हारा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपी संजय नवलकर यास अटक करून कलम ३०२, ३२४, ५०४ सहकलम ३(२) नुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी