शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला त्याच्यासोबत पाहून भडकला पती; दोघांवर थेट बॉम्ब फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 22:06 IST

पत्नी आण तिचा मित्र हल्ल्यात जखमी; फरार पतीचा शोध सुरू

लखनऊ: पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून भडकलेल्या पतीनं दोघांवर क्रूड बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना अयोध्येतल्या काशीराम वसाहतीत घडली. यानंतर पत्नी आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीला श्रीराम रुग्णालयात नेण्यात आलं. बॉम्बफेक केल्यानंतर पती जालीम सिंह घटनास्थळावरुन फरार झाला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. जालीम सिंह आणि त्याची पत्नी कोमल गेल्या सहा महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. कोमलचं मनोज नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय जालीमला होता, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली. जालीमनं बॉम्ब फेकले, त्यावेळी मनोज कोमलसोबतच होता. शनिवारी रात्री जालीम सिंह कोमलच्या घराजवळ गेला. त्यावेळी त्याला मनोज आणि कोमल बोलताना दिसले. त्यावेळी जालीमनं दोघांच्या दिशेनं बॉम्ब फेकले. जालीम आणि कोमल यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. तेव्हापासूनच जालीम स्वत:सोबत क्रूड बॉम्ब घेऊन फिरत असावा, असा संशय पोलीस अधिकाऱ्यानं व्यक्त केला. घटनास्थळी पोलिसांना एक जिवंत बॉम्ब सापडला. तो निकामी करण्यात पोलिसांना यश आलं. 'मी कोमलला भेटण्यासाठी काशीराम वसाहतीत गेलो होतो. त्यावेळी जालीम सिंहनं माझ्या दिशेनं बॉम्ब फेकले. त्यानं पहिला बॉम्ब फेकला, त्यावेळी मी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यातून मी बचावलो. मात्र दुसऱ्या बॉम्ब हल्ल्यात मी जखमी झालो,' अशी माहिती मनोजनं माध्यमांना दिली.जालीम सिंहनं चार ते पाच बॉम्ब फेकल्याचं कोमलनं सांगितलं. जालीमनं फेकलेल्या एका बॉम्बचा स्फोट माझ्या पायाजवळ झाला. जालीमच्या वर्तणुकीची तक्रार मी पोलिसांकडे आधीच केली होती. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, अशी माहिती तिनं दिली. जालीम सिंह मारहाण करत असल्यानं त्याच्यासोबत राहत नसल्याचं कोमलनं सांगितलं. आरोपी जालीम सिंहनं पत्नी आणि तिच्या मित्रावर क्रूड बॉम्बनं हल्ला केल्याची माहिती अयोध्या विभागाचे पोलीस अधिकारी अमर सिंह यांनी दिली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच जालीम सिंहला पकडण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्या