शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा गुन्हा ‘आपसात मिटवता येण्याजोगा’ करा - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 07:58 IST

तडजोडीबाबत केंद्र सरकारने विचार करावा 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय दंडसंहिता कलम ४९८ (ए) अंतर्गत पती व त्याच्या नातेवाइकांनी पत्नीबरोबर केलेल्या क्रूरतेचा गुन्हा हा ‘आपसात मिटवता येण्याजोग्या’ गुन्ह्यात रुपांतर करण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली. 

दरदिवशी आयपीसी ४९८ (ए) अंतर्गत किमान १० प्रकरणे अशी समोर येत आहेत. यात दोन्ही पक्षकारांनी संमतीने गुन्हा रद्द करण्याची मागणी केलेली असते. मात्र, या कलमाअंतर्गत दाखल गुन्हा  तडजोडीतून रद्द करण्यासारखा नसतो, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने नमूद केले आहे. एका व्यक्तीने, आई व बहिणीने आयपीसी ४९८ (ए) अंतर्गत पुणे पोलिसांत दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर २३ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. या आदेशाची प्रत बुधवारी उपलब्ध झाली असून, न्यायालयाने यात वरील सूचना केली आहे.    आयपीसी कलम ४९८ (ए) अंतर्गत दाखल गुन्हा आपसात मिटवण्या येण्याजोगा गुन्हा नसल्याने पक्षकारांनी हे प्रकरण सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न केला तरी आरोपीला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात  धाव घ्यावीच लागते. 

ज्या व्यक्तींसंबंधित खटला आहे, त्या व्यक्तींना खेड्यापाड्यांतून प्रवास करून न्यायालयात उपस्थित राहावे लागते. खटल्याचा खर्च, प्रवास खर्च शिवाय निवासाचा खर्चही त्यांना करावा लागतो. त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. न्यायालयाच्या परवानगीने  आयपीसी कलम ४९८ (ए) आपसात मिटवता येण्याजोगा गुन्हा केला तर पक्षकारांना होणाऱ्या त्रासाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाचाही बहुमूल्य वेळ वाचू शकेल, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांना सदर बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश दिले.

 पती-पत्नीने सामंजस्याने सोडवला वाद  याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की, तो व त्याच्या पत्नीने सामंजस्याने वाद सोडवला आहे. त्याने तिला २५ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे आणि ते दोघे सामंजस्याने घटस्फोट घेण्यास तयार आहेत. तक्रारदार पत्नीनेही न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत पतीने गुन्हा रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेवर आक्षेप घेत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने तिचे म्हणणे मान्य करत पती व त्याच्या नातेवाइकांवरील गुन्हा रद्द केला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय