शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

साडेसतरा लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीनेच मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 03:13 IST

अल्पवयीन मोलकरणीनेच साडेसतरा लाख किमतीच्या हिरेजडित दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना मलबार हिल येथे उघडकीस आली.

मुंबई : मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत घरातील अल्पवयीन मोलकरणीनेच साडेसतरा लाख किमतीच्या हिरेजडित दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना मलबार हिल येथे उघडकीस आली. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून मोलकरणीविरुद्ध गुन्हा दाखल करीत, तिच्याकडे चोरी केलेल्या दागिन्यांबाबत अधिक तपास सुरू आहे.नेपियन्सी रोड परिसरात राहणारे आशिष अग्रवाल (४२) यांच्या घरात ही चोरी झाली. त्यांचा ड्रायफ्रुट विक्रीचा व्यवसाय आहे. मुलीच्या देखभालीसाठी त्यांनी घरकाम करणाऱ्या नोकर महिलेच्या १७ वर्षीय चुलत बहिणीला ९ फेब्रुवारीपासून नोकरीवर ठेवले. ती तेथेच राहत होती. राजस्थानला लग्न असल्याने १० मार्च रोजी अग्रवाल यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले दागिने तपासले. त्यात, हिरेजडित कर्णफुलांची एक जोडी गायब असल्याचे दिसून आले. मात्र लग्नाची घाई असल्याने त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. पुढे, १२ मार्च रोजी घरी आल्यानंतर पुन्हा एकदा दागिने तपासले तेव्हा त्यात काही दागिने गायब असल्याचे दिसले. १३ मार्च रोजी त्यांनी घरातील अन्य सदस्यांनाही दागिने तपासण्यास सांगितले. तेव्हा आईचेही दागिने मिळून आले नाही. यात, साडेसतरा लाखांचे दागिने गायब होते.घरातील सर्व नोकरांकडे याबाबत चौकशी केली. मात्र सर्वांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. याच दरम्यान सोसायटीत येणाºया अनोळखी लोकांची यादी माय गेट या अ‍ॅपमध्ये जतन करण्यात येते. त्यातील माहितीनुसार, सोसायटीत अनोळखी व्यक्ती आली नसल्याचे समजले. त्यामुळे नोकरांपैकीच कोणीतरी ही चोरी केल्याचा संशय त्यांना आला. अल्पवयीन नोकर मुलीच्या संशयास्पद हालचाली त्यांनी हेरल्या. तिच्याकडे उलटतपासणी सुरू करताच तिने चोरी केल्याची कबुली दिली.यात ९ फेब्रुवारी ते १२ मार्चदरम्यान अल्पवयीन मोलकरणीने तब्बल १७ लाख ५० हजार रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केला होता. या प्रकरणी अग्रवाल यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई