शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!

By राजकुमार जोंधळे | Updated: May 3, 2025 21:29 IST

७ मे पर्यंत पाेलिस काेठडी

राजकुमार जाेंधळे / लातूर : माहेश्वरी बहुउद्देशिय सहकारी पतसंस्था मर्या. लातूर येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये ८ काेटी १८ लाख ८९ हजार ७०५ रुपयांच्या अपहार प्रकरणी गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. यातील दीड वर्षांपासून फरार असलेला रोखपाल सोमनाथ गोरख पंडीत याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढोकी (जि. धाराशिव) येथून रात्री १० वाजता अटक केली. त्याला शनिवारी लातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ७ मे पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.

पाेलिसांनी सांगितले, फेब्रुवारी २०२४ मध्ये माहेश्वरी बहुउद्देशिय सहकारी पतसंस्था मर्या. लातूर येथील शाखाधिकारी आणि राेखपाल याने अपहार केल्याची घडना घडली होती. त्यानुसार गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यात विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, लातूर यांनी दिलेल्या अहवालानंतर पोलिसांच्या तपासाला गती मिळाली. माहेश्वरी पतसंस्थेचा व्यवस्थापक, राेखपाल याच्यासह इतरांनी तब्बल ८ लाख १८ लाख ८९ हजार ७०५ रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या गुन्ह्याची व्याप्ती आणि अपहाराची रक्कम मोठी असल्याने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला. गुन्ह्यातील दीड वर्षांपासून फरार असलेला राेखपाल सोमनाथ पंडीत हा ढोकी (जि.धाराशिव) येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली. या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढोकीत सापळा लावला. सोमनाथ पंडीत हा त्याच्या भावाच्या दुकानात आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला रात्री १० वाजता ताब्यात घेतले. 

आरोपीच्या चाैकशीतून माहेश्वरी पतसंस्थेतील अपहाराची स्थिती, सहआरोपींची माहिती, अपहाराच्या रक्कमेचा विनियोग या बाबींचा खुलासा होणार आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपाधीक्षक सुरेशकुमार राऊत, अंमलदार राजेश्वर हम्पल्ले, नामदेव पाटील, युवराज गाडे, रामानंद इरपे, बाळासाहेब ओवांडकर, अर्जुन कार्लेवाड यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :laturलातूरfraudधोकेबाजी