शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्न करण्यासाठी पठ्ठ्यानं भलताच कांड केला; मंडपाऐवजी थेट जेलमध्येच पोहचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 13:18 IST

पोलीस निरीक्षक अंकित मिश्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष पथक नेमत या प्रकरणाचा तपास सुरु केला.

मध्य प्रदेशातील कटनी येथे पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली एका युवकाला अटक केली आहे. लग्नासाठी पैशाची गरज भासल्याने आरोपीने चोरी केली. चोरीचा प्लॅन रचला, तो अंमलात आणण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि जेलमध्ये पाठवलं. पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कमेशिवाय मोबाईल, दुचाकीही जप्त केली.

कटनी जिल्ह्यातील बडवारा तालुक्यात मध्य प्रदेश ग्रामीण बँकेत काही दिवसांपासून चोराने बँकेंची भिंत तोडून १ लाख २७ हजार २१२ रुपये चोरी केले होते. ज्याची तक्रार बँकेचे मॅनेजर यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणात पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या ७२ तासांत पोलिसांनी अगदी शिताफीने आरोपीला अटक करत त्याला लग्नमंडपाऐवजी जेलमध्ये पाठवलं.

पोलीस निरीक्षक अंकित मिश्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष पथक नेमत या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांना मिळालेल्या सूचनेवरुन त्यांनी रोहनिया गावातील सुभाष यादव या २९ वर्षीय युवकाला ताब्यात घेतलं. हा युवक त्याच्या मित्रांना पार्टी देत होता. संशयाच्या आधारे पोलिसांनी सुभाषला ताब्यात घेत कसून चौकशी सुरु केली. तेव्हा पोलिसांसमोर युवकाची बोबडी वळाली. त्याने सर्वकाही सत्य पोलिसांसमोर सांगितले. मीच बँकेत चोरी केल्याचं आरोपीने कबुल केले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने लग्नासाठी ही रक्कम चोरी केली होती. त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे संधी मिळताच त्याने ६ आणि ७ जानेवारीला रात्री मध्य प्रदेश ग्रामीण बँकेची भिंत तोडून त्याठिकाणाहून १ लाख २७ हजार रुपये चोरले. चोरलेल्या रक्कमेपैकी पोलिसांनी १ लाख १४ हजार रोकड आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईल, घटनेत वापरण्यात आलेली बाईक, सुटकेस जप्त केली आहे. आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत पाठवले. आर्थिक तंगी असल्याने आणि अलीकडेच त्याचे लग्न ठरले होते. त्यामुळे आरोपीने अनेक दिवसांपासून बँकेत चोरी करण्याची योजना आखली. चोरी करण्यात आरोपीला यश आलं  परंतु अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश