शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लंडनहून पुस्तके पाठविण्याची थाप : वैद्यकीय विद्यार्थ्याला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 19:58 IST

विदेशी फेसबुक फ्रेंडने लंडनमधून स्वस्तात वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके पाठवतो, असे सांगून मेडिकलच्या एका विद्यार्थ्याला १ लाख ४३ हजार रुपयाचा गंडा घातला. याप्रकरणी सोमवारी अजनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशी फेसबुक फ्रेंडने लंडनमधून स्वस्तात वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके पाठवतो, असे सांगून मेडिकलच्या एका विद्यार्थ्याला १ लाख ४३ हजार रुपयाचा गंडा घातला. याप्रकरणी सोमवारी अजनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित तरुण २५ वर्षांचा असून पोलिसांच्या माहितीनुसार, तो मेडिकलचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकवरून लंडनच्या इसाबेला लुसी नामक एका तरुणीसोबत त्याची मैत्री झाली. त्यानंतर हे दोघे आॅनलाईन संपर्कात होते. दोघांनीही एकमेकांबाबतची कौटुंबिक, व्यवसाय आणि शैक्षणिक माहिती एकमेकांना आदानप्रदान केली. लुसीने पीडित विद्यार्थ्याला आपला शैक्षणिक साहित्य आणि पुस्तके विकण्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले. आमच्याकडे अत्यंत स्वस्त किमतीत वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके मिळत असल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे पीडित तरुणाने तिला आपल्यासाठी काही चांगली पुस्तके पाठविण्यास सांगितले. २९ जूनला लुसीने फोन करून पीडित तरुणाला त्याची पुस्तके दिल्लीतील कस्टम अधिकारी प्रिया शर्मा हिच्या माध्यमातून पाठविल्याचे सांगितले.ही पुस्तके मिळविण्यासाठी कथित कस्टम अधिकारी प्रिया शर्माचा मोबाईल नंबरही पीडित तरुणाच्या मोबाईलवर पाठवला. त्यावर विश्वास ठेवून पीडित तरुणाने प्रिया शर्मासोबत संपर्क साधला. शर्माने पीडित विद्यार्थ्याला दिल्लीतील आसिफ खान नामक व्यक्तीचा बँक खात्याचा नंबर दिला. हे आमचे कस्टम विभागप्रमुख आहेत, असे सांगून त्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्यानंतर पुस्तके मिळतील, असे सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्याने आसिफ खानच्या खात्यात इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून १ लाख ४३ हजार रुपये जमा केले. २९ जूनच्या सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा व्यवहार पार पडला. त्यानंतर विद्यार्थ्याने पुस्तकांची डिलिव्हरी मागितली असता आरोपी टाळाटाळ करू लागले. ते असंबंद्ध माहिती देत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्याला संशय आला. त्यामुळे त्याने आरोपींना तातडीने पुस्तक द्या अन्यथा पोलिसांकडे तक्रार करतो, असे म्हटले. त्यानंतर आरोपींनी पीडित विद्यार्थ्यांसोबत संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे पीडित विद्यार्थ्याने सायबर शाखेत धाव घेतली.तेथून चौकशी झाल्यानंतर याप्रकरणी सोमवारी अजनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.लुसीनेच पाठविली होती फ्रेंड रिक्वेस्टया प्रकरणात कथित प्रिया शर्मा आणि आसिफ खानचे नाव आले असले तरी मुख्य सूत्रधार इसाबेला लुसी हीच असावी, असा संशय आहे. तिनेच नऊ महिन्यापूर्वी विद्यार्थ्याला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्याच्य संबंधीची आर्थिक, कौटुंबिक माहिती घेतल्यानंतर त्याला कशा पद्धतीने फसवता येईल, याबाबतचा कट लुसीनेच रचला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. पोलीस कथित लुसी आणि तिच्या साथीदारांचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी