शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'शाळा सुरू करा नाहीतर...'; विद्यार्थ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना धमकीचा मेसेज!

By मोरेश्वर येरम | Updated: November 25, 2020 14:02 IST

उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ क्रमांकावर एक मेसेज आला. ज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना शाळा आणि महाविद्यालयं अद्याप सुरू न केल्यामुळे विद्यार्थ्यांच होणाऱ्या नुकसानावरुन धमकीचा मेसेज केला गेला.

ठळक मुद्देशाळा सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्याचा थेट योगी आदित्यनाथ यांना धमकीचा मेसेजमेसेज आलेल्या मोबाइल धारकाचा पाठलाग करत लखनऊ पोलीस पोहोचले आग्र्यातअल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी

आग्राशाळा आणि महाविद्यालय अद्याप सुरू न केल्यानं एका विद्यार्थ्यानं थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकीचा मेसेज केला. उत्तर प्रदेश पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला अटक केली आहे. 

उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ क्रमांकावर एक मेसेज आला. ज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना शाळा आणि महाविद्यालयं अद्याप सुरू न केल्यामुळे विद्यार्थ्यांच होणाऱ्या नुकसानावरुन धमकीचा मेसेज करण्यात आला होता. मेसेज मिळताच पोलीस सतर्क झाले. लखनऊ पोलिसांनी मेसेज आलेल्या मोबाइल क्रमांकाचा तपास केला तेव्हा मेसेज आग्रा येथून आल्याचं समोर आलं, अशी माहिती पोलीस उपायुक्त रईस अख्तर यांनी दिली. 

आग्र्याला पोहोचले लखनऊचे पोलीसधमकीचा मेसेज आलेला मोबाइल क्रमांक आग्रा येथील असल्याचं कळाल्यानंतर लखनऊ पोलिसांनी आग्र्याला येण्यापूर्वी पोलीस ठाण्यात मोबाइल धारकाविरोधात एफआयआर दाखल केली. त्यानंतर लखनऊ पोलीस थेट आग्र्याला पोहोचले. पण धमकीचा मेसेज करणाऱ्या विद्यार्थ्याला पकडल्यानंतर तो अल्पवयीन असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यानं सहज मेसेज केला असं सांगितलं. 'शाळा बंद असल्यानं आमचं नुकसान होत आहे, त्यामुळे मी मेसेज केला होता, असं तो म्हणाला.

पोलिसांनी मोबाइल आणि सीमकार्ड जप्त करुन अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.