शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या, अंबरनाथमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 02:04 IST

incident in Ambernath : अंबरनाथमधील एका खासगी कंपनीमध्ये अजित सहा आणि संदीप सक्सेना हे दोघे मित्र काम करत होते.

अंबरनाथ : एक महिन्यांपूर्वी विवाहित महिला व तिच्या प्रियकराचा मृतदेह इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये आढळला होता. दोघांचेही गळे इलेक्ट्रिक ग्राइंडरने कापलेले आढळले होते. पोलिसांच्या तपासानुसार प्रियकराने अगोदर प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी यासंदर्भात प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबरनाथमधील एका खासगी कंपनीमध्ये अजित सहा आणि संदीप सक्सेना हे दोघे मित्र काम करत होते. दोघांचेही एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. यामुळे अजितची पत्नी जयंती व संदीप यांच्यात जवळीक निर्माण होऊन त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. जयंती १७ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती अजितने शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये नोंदविली होती. १८ नोव्हेंबर रोजी संदीप राहत असलेल्या आनंदनगरमधील प्रसादम या गृहसंकुलातील एका फ्लॅटमध्ये संदीप आणि जयंतीचा मृतदेह आढळून आला. 

वादातून घडले कृत्य संदीपच्या घरच्या मंडळींनी त्याचे दुसरे लग्न ठरविले होते. ही गोष्ट जयंतीला कळल्यानंतर ती संदीपला भेटायला घरी गेली. संदीपच्या लग्नावरून दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात संदीपने जयंतीचे डोके जमिनीवर आपटले, नंतर इलेक्ट्रिक ग्राइंडर सुरू करून तिचा गळा कापला. रक्तस्राव झाल्यामुळे जयंतीचा जागीच मृत्यू झाला. नंतर संदीपने स्वतःचा गळाही ग्राइंडरने कापून आत्महत्या केली. 

टॅग्स :Suicideआत्महत्या