शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या ट्रेनसमोर प्रेमी युगलानं मारली उडी; आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:13 IST

हे प्रकरण सदर ठाणे हद्दीतील सांडा गाव येथील आहे. गुरुवारी रात्री प्रेमी युगलाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून जीव दिला.

धौलपूर - राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात एका प्रेमी युगलानं ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले असून घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. ज्यात प्रेमी युगलाने आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांची नावं लिहिली होती. या घटनेनंतर मृतकांच्या कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे. 

हे प्रकरण सदर ठाणे हद्दीतील सांडा गाव येथील आहे. गुरुवारी रात्री प्रेमी युगलाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून जीव दिला. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी सोशल मीडियावर सुसाईड नोट पोस्ट केली होती. जी अल्पवयीन प्रेयसीनं लिहिली होती. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी प्रेयसीनं ८ जणांना दोषी ठरवलं होते. त्याचसोबत प्रियकर सोनूच्या कुटुंबाला काहीही त्रास देऊ नका असं म्हटलं आहे. सोशल मीडियावरील सुसाईड नोटबाबत मृत युवकाच्या मित्रांनी पोलिसांना कळवलं. 

सुसाई़ड नोटमध्ये काय लिहिलं?सुनील, पूजा, पीयूष, पंकज, लक्ष्मी, भूरी देवी, रामवीर यांच्यामुळे आम्ही आत्महत्या करतोय. आमच्या मृत्यूनंतर सोनूच्या कुटुंबावर कुठलाही आरोप ठेवू नये. आम्ही शुद्धीत हे सगळं लिहितोय. हे ८ जण मला सोनू सोबत लग्न न करण्यासाठी दबाव टाकत होते. आम्ही दोघांनी मरावं अशीच त्यांची इच्छा होती. त्यासाठी आम्ही आमचं जीवन संपवतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी वारंवार सांगेन आमच्या मृत्यूनंतर सोनूच्या घरच्यांवर कुठलाही आळ लावू नका, त्यांना त्रास देऊ नका असं म्हटलंय. 

या प्रकरणी एएसआय हाकिम सिंह म्हणाले की, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एका युवक-युवतीने आत्महत्या केल्याची सूचना पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलो तेव्हा तिथे दोघेही मृत अवस्थेत आढळले. या दोघांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले.