शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर तीन महिन्यांतच संपले प्रेम, नवविवाहितेची आत्महत्या; पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 06:49 IST

सायंकाळी मात्र नेहाने दरवाजा आतून बंद केल्याचे सविता यांना सांगितले. त्यानंतर काही वेळाने सविता यांनी किरणला विचारणा केली असता नेहाने गळफास घेतल्याचे त्याने सांगितले.

मीरारोड : प्रेमविवाह करून तीन महिने होत नाही, तोच चारित्र्याच्या संशयावरून मारझोड करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

भाईंदर पश्चिमच्या मूर्धा गाव सार्वजनिक शौचालयजवळ राहणाऱ्या २० वर्षीय किरण रमेश चव्हाण आणि जवळच राई शिवनेरी येथे राहणारी २० वर्षीय नेहा मोहन दामले यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये एका मंदिरात प्रेमविवाह केला होता. नेहा लग्नानंतर किरणसोबत माहेरी येत-जात होती. तिच्या आईसह कुटुंबीयांचेही नेहाच्या सासरी येणे-जाणे होते, परंतु लग्नाच्या काही दिवसांनीच किरण कामाला जात नाही, कोणाशी फोनवर बोलली तरी संशय घेऊन मारझोड करतो, असे नेहाने आई सविता हिला सांगितले. त्यावर सविताने त्यांची समजूत काढली. जानेवारीत किरण दुचाकी घेऊन आला आणि हप्ता भरायचा म्हणून नेहाच्या वडिलांकडून १० हजार रुपये उसने घेतले. १८ फेब्रुवारीला किरणने सविता यांना कॉल करून नेहा रात्री-अपरात्री कोणाशी, तरी फोनवर बोलते, अशी तक्रार केली असता सविता यांनी दोघांना घरी बोलावून समजावले.

समजूत काढूनही घेतला गळफासआईने समजूत काढल्याच्या दुसऱ्या दिवशी नेहाने आईला कॉल करून मला घरी घेऊन जा, असे सांगितले. सायंकाळी मात्र नेहाने दरवाजा आतून बंद केल्याचे सविता यांना सांगितले. त्यानंतर काही वेळाने सविता यांनी किरणला विचारणा केली असता नेहाने गळफास घेतल्याचे त्याने सांगितले. तिला भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात नेले असता तिचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सविता यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलिसांनी २० फेब्रुवारीला गुन्हा दाखल करून किरणला अटक केली आहे. मंगळवारी ठाणे न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.