शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दहशत पसरविणाऱ्या तिघांवर स्थानबद्धतेची कारवाई, पाेलीस आयुक्तांचा बडगा

By जितेंद्र कालेकर | Updated: May 19, 2023 21:05 IST

एमपीडीए अंतर्गत एक वर्ष येरवडा कारागृहात रवानगी

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शहर पोलीस आयुक्तालयामधील कासारवडवली, कळवा आणि उल्हासनगर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दहशत पसरविणाऱ्या घाेडबंदर राेडवरील डाेंगरपाडा येथील कुप्रसिद्ध गुंड धीरज ऊर्फ विकी संतोष रेड्डी (२९), कळवा पूर्व येथील कुप्रसिद्ध गुंड सोनू ओमकार पवार (२६) आणि उल्हासनगर नंबर २ येथील कुप्रसिद्ध गुंड जग्गू सरदार ऊर्फ जगदीश तीरथसिंग लबाना (४०) या अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी केली आहे. तिघांनाही एक वर्षासाठी पुण्याच्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

विकी रेड्डी याच्यावर कासारवडवली पोलिस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, दुखापत, दमदाटी आणि शिवीगाळ करणे, धमकी देणे, ठार मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगणे असे पाच गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करून त्याला पुणे येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध केले आहे. तर सोनू पवार याच्यावरही कळवा पोलिस ठाण्यात जबरी चोरी करण्याचा प्रयत्न आणि ठार मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच जगदीश लबाना याच्यावर उल्हासनगर पोलिस ठाण्यात खंडणी, दुखापत, विनयभंग, शिवीगाळ, धमकी देणे असे ६ गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध ही कारवाई केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

या वर्षात एकूण ९ जणांना केले स्थानबद्ध

ठाणे पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्या आणि सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार २०२३ मध्ये आतापर्यंत ९ सराईत तसेच अट्टल गुन्हेगारांविरोधात एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई केली आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस