शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

जम्मू - काश्मीरमधील ७ टॉप दहशतवादी कमांडरची यादी जारी, जाणून घ्या कोण कोण आहेत

By पूनम अपराज | Updated: November 5, 2020 22:11 IST

Terrorism : सर्व काश्मीरमधील दहशतवाद वाढविण्याच्या समाजविघातक कामात सामील आहेत.

ठळक मुद्देसुरक्षा दलाकडून काश्मीरमधील दहशतवाद निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांनी सात दहशतवादी कमांडर्सची यादी जारी केली आहे. या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत. कारण ते सर्व काश्मीरमधील दहशतवाद वाढविण्याच्या समाजविघातक कामात सामील आहेत. त्यामध्ये जवळजवळ सर्व ए प्लस श्रेणीचे दहशतवादी आहेत. यादी जाहीर झाल्यानंतर सुरक्षा दलाने या अतिरेक्यांना संपूर्ण कार्यक्षमतेने संपवण्यासाठी तयारी केली आहे.सुरक्षा दलाकडून काश्मीरमधील दहशतवाद निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यावर्षी रियाज नायकू आणि डॉ सैफल्लाह हिजबुलचे दोन कमांडर मारले गेले. त्यानंतर, सुरक्षा दलांनी सात बड्या कमांडरची यादी जारी केली आहे. या यादीतील पहिला म्हणजे अल बद्रचा सेनापती जावेद अहमद मटाटू यांचे नाव आहे. 2010 पासून तो काश्मीरमध्ये सक्रिय होता आणि अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. अल बदरमधील दहशतवाद्यांची संख्या वाढविण्यासाठी ते तरुणांना दहशतवादाच्या मार्गावर आणण्याचे काम करतात.या यादीत दोन पाकचे दहशतवादीही आहेतदुसर्‍या क्रमांकावर लष्करचा कमांडर मोहम्मद सलीम परी उर्फ ​​बिल्ला आहे. सन 2017 मध्ये दहशतवादामध्ये सामील होता. मोहम्मद अशरफ खान आणि हिजबुलचे फारूक अहमद बट, मुहाराजादीन ऊर्फ उबैद आठ वर्षांपासून काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. हे तिघे भयानक दहशतवादी आहेत. लष्करचे पाकिस्तानी दहशतवादी एजाज उर्फ ​​अबू  हुरेररा   आणि बदर नदीम उर्फ ​​हाफिज हेही या यादीत आहेत. आजकाल तो बारामुल्ला येथे आपला अड्डा बनवून दहशतवादी हल्ल्याच्या नियोजनात गुंतला आहे.यावर्षी 200 दहशतवादी ठार झालेया सात कमांडरांच्या खात्म्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे खंडित होईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी सुरक्षा दलांनी काश्मिरात 200 अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. यात बहुतेक हिजबुल दहशतवादी ठार झाले आहेत. या हिजबुलचे 72 दहशतवादी ठार झाले. लष्करए तोयबाचे 59 ठार झाले. जैशकडे 37 दहशतवादी आणि उर्वरित इतर दहशतवादी संघटनेचे आहेत. काश्मीरमध्ये सध्या 205 दहशतवादी कार्यरत आहेत, त्यापैकी 95 पाकिस्तानी दहशतवादी आहेत. लष्कर ए तोयबाचे  55 आणि जैशचे 35 दहशतवादी वाचले आहेत.

टॅग्स :terroristदहशतवादीLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर