शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

कूकची हत्या करणाऱ्या वेटरला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 02:53 IST

चायनीज दुकानात काम करताना झालेल्या भांडणाच्या रागातून गॅस सिलिंडर मारून अजित रॉय (३०) या कूकची हत्या करणाऱ्या मंजितकुमार सरोज (३५) या वेटरला ठाणे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी नुकतीच जन्मठेप तसेच मोबाइल चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावली. 

ठाणे : चायनीज दुकानात काम करताना झालेल्या भांडणाच्या रागातून गॅस सिलिंडर मारून अजित रॉय (३०) या कूकची हत्या करणाऱ्या मंजितकुमार सरोज (३५) या वेटरला ठाणे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी नुकतीच जन्मठेप तसेच मोबाइल चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावली. भिवंडीतील पूर्णागावात असलेल्या तंदुरी कॉर्नर आणि चायनीज सेंटर या दुकानात वेटर मंजितकुमार याच्यासह कूक अजित तसेच अन्य कामगार असे तिघे काम करीत होते. कामावरून उद्भवलेल्या वादातून दोघांनी एकमेकांना ५ जुलै २०१७ रोजी रात्री शिवीगाळ केली. ६ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास दुकान बंद केल्यानंतर तिघेही कामगार दुकानात झोपले. मालक घरी निघून गेला; परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी येथील एका पानटपरीचालकाने फोन करून अजितला मार लागल्याची माहिती दिल्यानंतर दुकानमालक आणि त्याचा भाऊ तात्काळ दुकानावर आले. त्यांनी आतमध्ये पाहिले असता, दुकानामध्ये रक्ताच्या थारोळ्यात अजित पडला होता. त्यांनी अजितला नेमके काय झाले, याबाबत विचारल्यानंतर मंजितकुमारने झोपेतच कपाळावर गॅस सिलिंडर मारल्याची त्याने माहिती दिली. मंजितकुमारचा पसार झाला होता. अजितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोबाइलची केली चोरीमंजितकुमार विरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याच खटल्याची सुनावणी न्यायाधीश तांबे यांच्या न्यायालयात ३१ मार्च रोजी झाली. खून प्रकरणात जन्मठेप तर मोबाइल चोरीसाठी एक वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

टॅग्स :Courtन्यायालय