शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या पतीला पाठविले कथित प्रेम प्रकरणाचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 13:01 IST

जळगाव शहरात वास्तव्याला असलेल्या २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यानुसार, एका व्यक्तीने महिलेला वारंवार प्रेमप्रकरणाबाबत पत्र पाठविले आहे.

जळगाव : कथित प्रियकराने एका महिलेच्या पतीसह त्यांच्या नातेवाइकांना कथित प्रेमप्रकरणाबाबत पत्र पाठवून संसार मोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शहरात घडला आहे. या महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे महिलेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

शहरात वास्तव्याला असलेल्या २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यानुसार, एका व्यक्तीने महिलेला वारंवार प्रेमप्रकरणाबाबत पत्र पाठविले आहे. लग्न जुळल्यानंतर तिच्या होणाऱ्या पतीला पत्र पाठवून आमचे प्रेमसंबंध आहेत, असे नमूद करुन त्यात अश्लील शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे. दि. २१ एप्रिल २०१८ ते ७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत संबंधिताने हे पत्र पाठविले आहे.

लग्न झाल्यानंतरदेखील तिच्या पतीला व नातेवाइकांना पुन्हा पुन्हा पत्र पाठवून प्रेमसंबंध व अश्लील शब्दांचाच वापर केला आहे. तिचे लग्न जुळू नये. जुळलेच आहे तर ते टिकू नये. संसार तुटावा यासाठीच या कथित प्रेमप्रकरणाबाबत संबंधित व्यक्ती पत्र पाठवित असल्याचे महिलेचे म्हणणे आहे. शिवीगाळ करण्यासह ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली आहे. याप्रकरणात विनयभंगासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला अंमलदार भारती देशमुख करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी