शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेवरील दरोड्याचे इंटरनेटवर धडे; सिग्नल यंत्रणेची माहिती मिळवून दरोडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 12:48 IST

मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर पोटूळ रेल्वे स्टेशनजवळ दरोडा पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली

संतोष हिरेमठऔरंगाबाद :  सिग्नलशी छेडछाड करून एखादी रेल्वे कशी थांबविता येईल, याचे धडेच इंटरनेटवर व्हिडिओच्या माध्यमातून दिले जात आहेत. रेल्वेचे सिग्नल कसे काम करते, कोणकोणत्या बाबींमुळे रेल्वे थांबू शकते, याची विस्तृत माहिती देणारे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. देवगिरी एक्स्प्रेसवरील दरोड्यासाठी अशाच व्हिडिओंची मदत घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर पोटूळ रेल्वे स्टेशनजवळ दरोडा पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. यापूर्वी याच जागेवर अशा प्रकारे तीन रेल्वे थांबविण्यात आल्या. सिग्नल यंत्रणेशी संबंधित असलेली केबल कट करायची, त्यानंतर इमर्जन्सी सिग्नलवर कपडा टाकायचा, अशी क्लृप्ती दरोडेखोरांनी प्रत्येक वेळी वापरली आहे. लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तपासात सिग्नल यंत्रणेची माहिती कोणाला असते, याची पडताळणी करण्यात  येत आहे. 

यादरम्यान इंटरनेटवर रेल्वेच्या सिग्नलविषयी माहिती देणारे व्हिडिओ असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास पडले आहे. एक दाेन नव्हे तर अनेक व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ पाहून रेल्वेच्या सिग्नलच्या यंत्रणेची माहिती घेऊन त्याच्याशी छेडछाड करू शकत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे ही बाब वरिष्ठ कार्यालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.

‘एक्स्पर्ट’चा शोध सुरूरेल्वेच्या ‘टीएलजी’ बाॅक्समधील केबल कट केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत इमर्जन्सी सिग्नल लागते. ही बाबही इंटरनेटवरील व्हिडिओत सांगितली जात आहे.  त्यामुळेच इमर्जन्सी सिग्नलवर कपडा बांधला की रेल्वे थांबते, ही बाब दरोडेखोरांना माहिती आहे.

या व्हिडिओवर कोणाचे नियंत्रण?माहिती, ज्ञानदानाच्या दृष्टीने इंटरनेटवर व्हिडिओ टाकले जातात; मात्र त्यातून मिळणाऱ्या माहितीचा गैरवापर होत असल्याची शक्यता आता रेल्वेवर सुरू असलेल्या दरोड्याच्या सत्रांमुळे वर्तविली जात आहे. या व्हिडिओंवर कोणाचेही नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे.