शहरं
Join us  
Trending Stories
1
शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
2
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
3
झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
4
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
5
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
6
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
7
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
8
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
9
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
10
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
11
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
12
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
13
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
14
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
15
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
16
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
17
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
18
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
19
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
20
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
Daily Top 2Weekly Top 5

"सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 11:05 IST

लॉरेन्स बिश्नोई गँग आणि रोहित गोदारा हे सोशल मीडियावर एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या गोळीबारात बनवारी गोदारा नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. फ्रेस्नो काउंटी शेरिफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनवारी मूळचा सॅन होजेचा रहिवासी होता आणि अलीकडेच फ्रेस्नोमध्ये राहत होता. नॉर्थवेस्ट फ्रेस्नोमधील एका शॉपिंग सेंटरमध्ये दोन जणांवर गोळीबार झाला. या घटनेनंतर, लॉरेन्स बिश्नोई गँग आणि रोहित गोदारा हे सोशल मीडियावर एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत.

लॉरेन्सचा भाऊ, आरजू बिश्नोई आणि कुख्यात गँग सदस्य हॅरी बॉक्सरने रोहित गोदाराला "गद्दार" असं म्हणत जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. आरजू बिश्नोई आणि हॅरी बॉक्सर दोघेही अमेरिकेत लपून बसले आहेत. रोहित गोदाराने सोशल मीडियावर पोस्ट करून दावा केला आहे की, त्यानेच हा हल्ला घडवून आणला होता आणि त्याचं टार्गेट लॉरेन्स गँगचा सदस्य हॅरी बॉक्सर होता, जो गोळीबाराच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता.

गोदाराने लॉरेन्स बिश्नोईवरही निशाणा साधला आणि बॉक्सरला भित्रा म्हटलं. यानंतर हॅरी बॉक्सरने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. बॉक्सरने सांगितलं की, तो घटनेच्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि तो कधीही त्या शहरात गेला नव्हता. त्याने आरोप केला की रोहित गोदाराच्या गँगने एका गरीब, निष्पाप मुलाला मारलं. बॉक्सर म्हणाला, "हा गद्दार माझ्या आणि लॉरेन्स भाईच्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवू इच्छितो. त्यांना आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सात पिढ्या लागतील..."

"रोहित गोदारा हा एक लपलेला उंदीर आहे. तुला मारण्यासाठी मला शस्त्राची गरज नाही. मी तुला माझ्या स्वतःच्या हातांनी मारेन. एकदा तू लोकेशन सांग म्हणजे तुला समजेल. रोहित गोदारा हा सर्वात मोठा गद्दार आहे - त्याच्या नावातच गद्दारी आहे. त्याची खरी ओळख तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आम्हाला माहिती आहे - तो आमच्या समोर काहीच नाही."

आरजूने स्पष्टपणे इशारा दिला की, रोहित गोदाराला लवकरच प्रत्युत्तर दिलं जाईल. तो वारंवार लॉरेन्सचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. या लोकांनी हे सुरू केलं आणि आम्ही ते संपवू. आम्ही त्यांना पोस्टने नाही तर गोळ्यांनी उत्तर देऊ." गेल्या अनेक दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई गँग आणि रोहित गोदारा यांच्यात सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lawrence Bishnoi gang threatens Rohit Godara after California shooting.

Web Summary : Following a California shooting, the Lawrence Bishnoi gang has threatened Rohit Godara, labeling him a traitor. Bishnoi's brother and Harry Boxer issued death threats, accusing Godara of exploiting their names for publicity. Godara claimed responsibility for the attack, escalating the feud.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmericaअमेरिकाFiringगोळीबार