शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 18:41 IST

तो  अनेक दहशतवादी गुन्ह्यात सामील असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देलष्कर - ए - तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर म्हणून तल्हा कार्यरत होता. रविवारी सायंकाळी देखील जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.

जम्मू - काश्मीर - जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जाचे कलम हालविल्यानंतर चिडलेल्या दहशतवाद्यांनी आता ट्रक ड्रायव्हर, व्यापारी आणि इतर राज्यांतील मजुरांना लक्ष्य करणे सुरू केले आहे. त्याप्रमाणे जम्मू - काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. काश्मीर झोन पोलिसांनी लष्कर - ए - तोयबाच्या तल्हा नावाच्या दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. लष्कर - ए - तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर म्हणून तल्हा कार्यरत होता. पाकिस्तानी खुणा असलेल्या वस्तू त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच तो  अनेक दहशतवादी गुन्ह्यात सामील असल्याची माहिती उघडकीस आली आहे.जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर येथील बांदीपोरा भागात आज पहाटे झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व स्फोटकं देखील जप्त करण्यात जवानांना यश आले आहे. कारवाईत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या कारवाईनंतर परिसरात शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आलेली आहे. आणखी दहशतवादी या भागात दडून बसलेले असल्याची माहिती मिळालेली होती. बांदपोरामधील लाडूरा गावात दहशतवादी असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या गावास वेढा देत शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. यावर जवानांनी दिलेल्या चोख प्रतित्त्युरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. रविवारी सायंकाळी देखील जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.याआधी श्रीनगर येथील मौलाना आझाद रोडवरील मार्केट परिसरात ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्यात पंधराजण जखमी झाले होते. तसेच, जम्मू-काश्मीरमधील सोपार भागात पोलिसांना लष्कर - ए - तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास अटक करण्यात यश आले होते. विशेष म्हणजे यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्र व स्फोटकं देखील जप्त करण्यात आली होती. तारिक चन्ना असं या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची पोलिसांकडे आहे.

टॅग्स :Lashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाterroristदहशतवादीArrestअटकJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान