शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाच्या खात्यातून लाखो रुपये लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 03:29 IST

कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या खात्यातून १५ वेळा, तर पवईतील मुख्याध्यापकाच्या खात्यातून ३ वेळा केलेल्या व्यवहारातून लाखो रुपये काढल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे.

मुंबई  -  कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या खात्यातून १५ वेळा, तर पवईतील मुख्याध्यापकाच्या खात्यातून ३ वेळा केलेल्या व्यवहारातून लाखो रुपये काढल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. आॅनलाइन ठगांविरुद्ध जूहू आणि पवई पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बदलापूरचे रहिवासी असलेले दत्तात्रय पांडुरंग पानसंडे (४९) हे कूपर रुग्णालयात नोकरीला आहेत. सोमवारी रुग्णालयात काम करत असताना, पावणे एक ते दोन दरम्यान मोबाइलवर धडकलेल्या संदेशामुळे त्यांना धक्का बसला. त्यांच्या एटीएम कार्डद्वारे १५ वेळा केलेल्या विविध व्यवहारांतून तब्बल १ लाख ५० हजार ३५४ रुपये काढण्यात आले होते. त्यांच्या कार्डची माहिती मिळवून कोणीतरी बनावट कार्डद्वारे हे पैसे काढले होते. याबाबत त्यांनी बँकेला कळवून जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू आहे.दुसºया घटनेत, पवईचे रहिवासी असलेले शिक्षक घनश्याम देवळेकर (५१) यांच्या खात्यातूनही २५ हजार रुपये काढण्यात आले होते. १० जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या एटीएम कार्डद्वारे ३ वेळा केलेल्या व्यवहारातून ही रक्कम काढण्यात आली होती. त्यांनी याबाबत बँकेकडे विचारणा केली, तेव्हा बँकेकडून पैसे परत मिळतील, असे समजताच त्यांनी दुर्लक्ष केले. सोमवारी त्यांनी बँकेत याबाबत पुन्हा विचारणा केली. मात्र, त्यांना बँकेकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी