शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भक्तांवर आसूड ओढून उकळले लाखो रुपये, नाशिकमध्ये ‘बडे बाबा’ला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 07:00 IST

Crime News : धगधगत्या निखाऱ्यांवरून चालणे, सप्ताह भरविणे, देव-देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणे यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांतून या बडे बाबाने लोकांचा विश्वास संपादन केला.

नाशिक :  भोळ्याभाबड्या भक्तांच्या शरीरावर चाबकाचे आसूड ओढत बनावट सोन्याच्या विटा दाखवून हजारो ते लाखो रुपयांची रोकड लाटणाऱ्या  ‘बडे बाबा उर्फ पाथर्डीवाला’ गणेश जयराम जगताप (३७) याने वडाळा-पाथर्डी रस्त्यावर ‘श्रद्धा व्हिला’मध्ये आलिशान आश्रम थाटला आहे. या भोंदूबाबाने नाशिकसह औरंगाबाद, लातूरमधील काही नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर येत असून, या बाबाला नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत.धगधगत्या निखाऱ्यांवरून चालणे, सप्ताह भरविणे, देव-देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणे यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांतून या बडे बाबाने लोकांचा विश्वास संपादन केला. ‘माझ्या ताब्यात दैवी शक्ती आहे. मी तुम्हाला जमिनीतून सोने काढून देतो आणि पैशांचा पाऊस पाडतो. माझी बड्या राजकीय लोकांसोबत गट्टी आहे, तुमच्या मुलांना सरकारी नोकऱ्या लावून देतो’, असे सांगून त्याने अहमदनगर, नांदेड, सोलापूर, लातूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, पुणे, अमरावतीसह राज्यात  मोठ्या उद्योजकांनाही  गळाला लावले. त्याने स्थानिक गुंडांना हाताशी धरून अघोरी कृत्य करत अनेकांची फसवणूक केली आहे. स्वत:च्या नावापुढे श्री श्री १००८ महंत गणेशानंदगिरीजी महाराज असे लिहून अनेकांना गंडा घातला. बडे बाबा मच्छिंद्रनाथ नावाने ट्रस्टही स्थापन केला. गणेश जगतापविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी निवेदनाद्वरे केली आहे.पूजाविधी अन‌् चमत्कारआशेवाडीतील मळ्यामध्ये चमत्काराच्या नावाखाली एका रानऔषधीचा वापर करत त्याचे मंजन स्वत:च्या दातावर तो लावत असे. त्याच्या उग्रवासामुळे समोरची व्यक्ती भान हरपायची आणि बाबा जे बोलेल त्यास होकार द्यायची. सुमारे आठ लाेकांना १९ लाखांना गंडा घातला. सोलापूरच्या विजयकुमार डिगेंकडून ७६ लाख रुपये उकळले. त्यांना बनावट सोन्याची बिस्किटे दिली. त्याची  तक्रार दिल्याचे  श्रीमंत बागल (लातूर) यांनी सांगितले. 

व्यवस्थापक ते ‘बडे बाबा’नाशिकमधील मंडप व्यावसायिकाकडे पूर्वी व्यवस्थापक म्हणून तो नोकरीला होता. दैवी शक्ती असल्याचे भासवून २०१२ पासून त्याने जाळे पसरविले. विश्वासू महिला सेवेकऱ्यांच्या नावाने त्याने बँकांमध्ये खाती उघडली आहेत.  

टॅग्स :Arrestअटक