शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कुरुलकरचे महिलेशी विवाहबाह्य संबंध, तक्रार केल्यास अडचणीत भर पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 07:39 IST

दोघांतील चॅटिंग तपास यंत्रणेला मिळाल्याचे दोषारोपपत्रात नमूद, प्रदीप कुरुलकरला सध्या २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा एटीएसने केलेल्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत

पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा संचालक (डीआरडीओ) डॉ. प्रदीप कुरुलकरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ताशी ‘बेब’ म्हणून चॅटिंग करणाऱ्या कुरुलकरबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रदीप कुरुलकरचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे उघडकीस आले असून, त्या दोघांमध्ये झालले चॅटिंग तपास यंत्रणेला मिळाले आहे, असे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात नमूद केले आहे. यामुळे कुरुलकर आणखी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. 

दरम्यान, याबाबत महिलेने अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार दिलेली नाही. याबाबत तिने तक्रार दिल्यास डॉ. कुरुलकर याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात एका किंवा त्यापेक्षा जास्त कलमांची वाढ होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी हेरांच्या जाळ्यात अडकून देशाच्या संरक्षण क्षेत्राशी निगडित गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली डॉ. कुरुलकर याला दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली.  हे प्रकरण उघडकीला आले तेव्हा संपूर्ण संरक्षण दलात एकच खळबळ उडाली होती. प्रदीप कुरुलकरला सध्या २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा एटीएसने केलेल्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या दोन हजार पानांच्या दोषारोपपत्रात त्या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. 

७० हून अधिक जणांचे जबाबपाकिस्तानी हेर झारा दासगुप्ताशी ब्राह्मोस, अग्नी ६, सरफेस टू एअर मिसाइल यासंबंधीची चॅटिंगद्वारे माहिती पुरविल्याचे उघडकीस आल्यानंतर आता कुरुलकरचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे या प्रकरणी दाखल असलेल्या दोषारोपपत्रातून पुढे येत आहे.  दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणात आतापर्यंत ७० हून अधिक जणांचे जबाब नोंदवून गोपनीय कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. 

टॅग्स :DRDOडीआरडीओ