शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कुर्ला हत्या प्रकरण : हत्या केली, पण बलात्कार केला नाही, आरोपींची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 10:16 IST

Kurla murder case: लग्नासाठी दबाव टाकत असल्याच्या रागात तरुणीची सुरा आणि हातोडीने हत्या केल्याची माहिती १८ वर्षीय तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीतून समोर आली आहे. तसेच त्यांनी बलात्कार केला नसल्याचे पोलिसांना सांगितले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दोघांनाही ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई : लग्नासाठी दबाव टाकत असल्याच्या रागात तरुणीची सुरा आणि हातोडीने हत्या केल्याची माहिती १८ वर्षीय तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीतून समोर आली आहे. तसेच त्यांनी बलात्कार केला नसल्याचे पोलिसांना सांगितले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दोघांनाही ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कुर्ला येथील एचडीआयएल या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पातील बंद पडलेल्या एका तेरा मजली इमारतीच्या गच्चीवर असलेल्या लिफ्ट रूममध्ये २५ नोव्हेबर रोजी व्हिडिओ शुटिंगसाठी गेलेल्या तरुणांना तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार, विनोबा भावे नगर पोलिसांनी बलात्कार, हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

विनोबा भावे नगर पोलिसांसह कुर्ला, धारावी पोलिसांची विविध पथके स्थापन करून अनोळखी महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. याचदरम्यान देवनार पोलीस ठाण्यात मिसिंग असलेली मुलगी मृत तरुणीशी मिळतीजुळती वाटत असल्याने तिच्या पालकांकडे पोलिसांनी चौकशी करत मृतदेह दाखवला. तो त्यांच्याच मुलीचा असल्याचे स्पष्ट होताच पथकाने मुलीच्या मित्रमैत्रिणींकडे तपास सुरू केला. तिच्या मोबाईल सीडीआरमधून गोवंडीतील प्रियकर रयान खानची (१९) माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी रयान आणि त्याचा मित्र फैसल शेख (१९) या दोघांना कुर्ला येथून ताब्यात घेतले. चौकशीत मृत तरुणी लग्नासाठी दबाव टाकत असल्याने २३ नोव्हेंबर रोजी मित्र फैसलच्या मदतीने तिची सुरा आणि हातोड़ीने हत्या केल्याची कबुली रयानने दिली आहे. मात्र बलात्कार केला नसल्याचेही त्याने नमूद केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई