शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीत कुडकुडतोय आफताब; कपडे खरेदीसाठी पोलिसांकडे मागतोय कार्ड अन् पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 19:56 IST

आफताब अमीन पूनावाला सध्या तुरुंगात आहे. आफताबच्या वकिलाने शुक्रवारी त्याचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धाचे 35 तुकडे करणारा आफताब अमीन पूनावाला सध्या तुरुंगात आहे. आफताबच्या वकिलाने शुक्रवारी त्याचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. आफताबला तुरुंगात कडाक्याच्या थंडीचा त्रास होत असल्याचं अर्जात म्हटलं आहे. त्याच्याकडे पुरेसे कपडे नाहीत. अशा स्थितीत दैनंदिन वस्तूंबरोबरच उबदार कपडे घेण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे.

आफताबच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, आफताब पूनावालाच्या बँक खात्यात काही पैसे आहेत. त्याचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड पोलीस अधिकाऱ्यांकडे आहेत. आफताबच्या वकिलाने युक्तिवाद केला की आरोपी 9 नोव्हेंबर 2022 पासून न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याच्याकडे हिवाळ्याच्या हंगामासाठी कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत.

न्यायालयाने आफताब अमीन पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. आरोपींना 10 जानेवारीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिल्लीत थंडी पडली आहे. अशा स्थितीत आफताबने त्याच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची मागणी केली आहे जे सध्या पोलिसांकडे आहे. थंडीवर मात करण्यासाठी आफताबला काही आवश्यक कपडे खरेदी करायचे आहेत.

आफताबने श्रद्धाची हत्या करून तिचे तुकडे केले. या प्रकरणाबाबत देशभरात संताप व्यक्त होत आहे. आफताबची पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट करण्यात आली आहे. सध्या तो तिहार तुरुंगात बंद आहे. मारेकरी आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे सुमारे 35 तुकडे केले. त्याने हे तुकडे दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या घरी 300 लिटरच्या फ्रीजमध्ये सुमारे तीन आठवडे ठेवले आणि नंतर अनेक दिवस दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फेकून दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर