शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विकी देशमुख टोळीवर अपहरण, खंडणीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 10:03 IST

८० लाख उकळले : बळकावली दगडखाण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेलचा गुंड विकी देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांवर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या नोंदीवर वॉन्टेड असताना गतवर्षी त्याने व्यावसायिकाचे अपहरण करून १० कोटीची खंडणी मागितली होती. तर ५० लाख घेतल्यानंतर त्याची सुटका केल्यानंतर पुन्हा ३० लाख रुपये उकळले होते.

पनवेल परिसरातील दगडखाण व्यावसायिकासोबत डिसेंबर २०२१ मध्ये हा प्रकार घडला आहे. अपहरणाच्या घटनेच्या काही दिवस अगोदरपासून त्यांना विकी देशमुख टोळीकडून खंडणीसाठी धमकी येत होत्या. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या विकी देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांनी १४ डिसेंबरला या व्यापाऱ्याचे पोलीस पाटी लावलेल्या गाडीतून पिस्तूलच्या धाकावर अपहरण केले होते. यानंतर त्यांना भिवंडी पाईपलाईन रोडवरून काही अंतरावरील जंगलात नेले होते. त्या ठिकाणी विकी देशमुख याने व्यापाऱ्याकडे १० कोटीची मागणी करत ती पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. परंतु तेवढी रक्कम नसल्याचे व्यावसायिकाने सांगितल्यानंतर शेवटी २ कोटी ठरवण्यात आले होते. तर दुसऱ्या दिवशी गुजरात रोडवर शिरसाठ फाट्यावर ती रक्कम स्वीकारून त्यांना सोडून देण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पुन्हा ३० लाख रुपये घेऊन नीलेश देशमुखच्या खात्यावर प्रतिमहिना ३५ हजार रुपये घेत होता. त्याशिवाय व्यावसायिकाच्या खाणीचा अर्धा हिस्सा जबरदस्तीने ताब्यात घेतला होता. मात्र गेल्या महिन्यात देशमुख याला अटक झाल्याचे समजल्यानंतर या व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार विक्रांत ऊर्फ विकी देशमुख, जितेंद्र देशमुख, परशुराम मोकल, उत्तम देशमुख, नीलेश देशमुख, धनेश थोरात, मयूर कोळी व इतर दोघे अशा ९ जणांवर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

फरार असतानाहीसुरू होते गुन्हेविकी देशमुख व त्याच्या टोळीवर मोक्का लागलेला असून यामध्ये ते पोलिसांना पाहिजे असतानाही तो उघडणे पनवेल परिसरात फिरून खंडणी उकळत होता असे या घटनेवरून समोर येत आहे. तर तक्रारदार व्यापाऱ्याला धमकावताना इतर एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी उचलायचा त्यांचा कट शिजत होता. शिवाय खंडणी नाकारल्यास अशोक घरतला जसे मारले तसे संपवू अशा धमक्याही दिल्या जात होत्या.