शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

डम्बेल्सचे नट काढले म्हणून केली सहकाऱ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 06:59 IST

डम्बेल्सचे नट काढल्याच्या रागात मुलुंड मर्डर मिस्ट्रीतील आरोपी योगेश राणे याने सहका-याची हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली.

मुंबई : डम्बेल्सचे नट काढल्याच्या रागात मुलुंड मर्डर मिस्ट्रीतील आरोपी योगेश राणे याने सहका-याची हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली. हत्येनंतर तो हॉटेलच्या रूमवर गेला. काहीच न झाल्याचे दाखवून त्याने पाच महिने दिनक्रम सुरू ठेवला.मूळचा रायगडचा असलेला राणे आईसह राहतो. २०१२ मध्ये जादूटोणा केल्याच्या संशयातून त्याने शारदा राऊत (५०) हिची हत्या केली. या प्रकरणी ३ वर्षे तो कैदेत होता. तेथून बाहेर पडल्यानंतर नोकरीच्या शोधात त्याने मुंबई गाठली. विश्वभारती हॉटेलमध्ये त्याला नोकरी मिळाली.तेथेच विजयकुमार यादव, नवाज नेपाळीही नोकरीला होता. त्याने व्यायामासाठी आॅनलाइन डम्बेल्स मागविले. तेथे सर्वांसमोर तो व्यायाम करत असे. विजयकुमारही त्याच्या डम्बेल्सला हात लावत असे. मात्र, ते जागेवर ठेवत नसल्याने राणेला राग आला. त्याने यादवला डम्बेल्सला हात न लावण्यास सांगितले. याच रागात यादवने डम्बेल्सचे नट काढले. त्यामुळे यादवला धडा शिकविण्यासाठी त्याने २६ जानेवारीच्या रात्री यादवला जेवण, दारूपार्टीसाठी नेले. केळकर कॉलेजमागील झुडपातच पार्टीनंतर जवळील हातोडीने त्याची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून रॉकेलने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.हत्येनंतर तो पुन्हा हॉटेलच्या रूमवर निघून गेला.दुस-या दिवसापासून त्याने नियमित दिनक्रम सुरू ठेवला. दुसरीकडे यादव हा गावी निघून गेल्याच्या शक्यतेतून हॉटेल व्यवस्थापनानेही दुर्लक्ष केले होते. २७ जानेवारीला अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. त्यानुसार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रताप भोसले, दीपाली कुलकर्णी, भरत जाधव, माने यांनी तपास सुरू केला. राणेने घटनास्थळावर नेपाळीच्या हत्येचा प्रयत्न केला व तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्या चौकशीतून वरील घटनाक्रम उघड झाला. त्याला न्यायालयाने १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तापट स्वभावातून त्याने आणखी हत्या केल्याचा संशय पथकाला आहे. हत्येसाठी वापरलेली हातोडी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

टॅग्स :Murderखून