शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लहानग्याच्या दुधाच्या पैशांमधून इडली घेतली; दारुड्या पित्याने करणचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 06:08 IST

छाेट्या बहिणीने माहिती देताच दारुड्या पित्याचा राग झाला अनावर

- जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अवघ्या २० दिवसांपूर्वी जन्माला आलेल्या लहानग्या बाळासाठी राखून ठेवलेल्या पन्नास रुपयांमधून करण प्रजापती या दहा वर्षीय मुलाने आईच्या परवानगीने इडली खाण्यासाठी वडिलांचे पैसे घेतले. हेच पैसे चोरल्याच्या संशयातून त्याचा पिता प्रदीप उर्फ बबलू प्रजापती याने करणला बुधवारी रात्री बेदम मारहाण केली. या जबर मारहाणीत पाण्याचा पाइपही तुटला. त्यानंतरही या मद्यपी पित्याने लोखंडी पाइपने मारहाण सुरूच ठेवली, ती अगदी करण निपचित पडेपर्यंत...

कळवा, खारेगावपासून पारसिकनगरचा डोंगर ओलांडल्यानंतर भास्करनगर आणि त्यानंतर असलेल्या वाघोबानगरातील डोंगरावर असलेल्या लक्ष्मीनगर चाळीत अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेमुळे रविवारीदेखील आपल्या मुलाच्या मृत्युमुळे त्याची आई बिमला सावरलेली नाही. तिला अजूनही करण येईल, त्याला भूक लागलेली असेल, तो कुठे आहे, अशी ती नातेवाईक आणि शेजाऱ्यांना विमनस्क अवस्थेत विचारपूस करीत असते. रविवारी तिच्या घरी जाऊन प्रस्तुत प्रतिनिधीने तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपले मूल नाहक गमावल्यामुळे तिचे ओघळणारे अश्रू बरेच काही बोलून गेले.

तिथे उपस्थित असलेली बबलूची चुलत बहीण पूनम प्रजापती (२१) म्हणाली, तो नेहमीच दारूच्या नशेत असायचा. त्याला करण (१०), गुड्डी (९), किसन (अडीच वर्षे) आणि २० दिवसांची वर्षा अशी चार मुले होती. लहानग्या वर्षासाठी हगिज आणि दुधासाठी ठेवलेलेच पन्नास रुपये करणने चोरल्याचा बबलूचा समज झाला. हे पैसे कोणी घेतले, अशी तो विचारणा करीत होता. ते करणने घेतल्याचे गुड्डीकडून समजल्यानंतर त्याचा पारा चढला. बांधकामावर मजुरी करणाऱ्या बबलूने प्लॅस्टिकच्या पाइपने मुलाला मारहाण केली. हा पाइपही तुटला, मग त्याने थेट पाण्याच्या लोखंडी पाइपने जबर मारहाण केल्याचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी सांगितले. 

चुलता आणि आजोबांनी केले अंत्यसंस्कारबबलूने स्वत:च्या भावाला घरातून सात वर्षांपूर्वी हाकलून दिले होते. करणच्याच वाढदिवसाला घरी आलेल्या वशिष्ठ प्रजापती या त्याच्या चुलत्याबरोबरही त्याने असेच भांडण उकरले होते. शनिवारी मोठ्या जड अंत:करणाने करणवर चुलते वशिष्ठ, आई आणि आजोबांनी अंत्यसंस्कार केले. आपल्या मुलांना तो खायलाही देत नव्हता. मग, मुलाने आईच्या सांगण्यानुसार हे पन्नास रुपये घेतले तर काय गुन्हा केला, असा सवाल बबलूचीच बहीण पूनमने उपस्थित केला. पत्नी आणि मुलांना बबलू नेहमीच दारू पिऊन मारहाण करायचा. पण त्या दिवशी इतके मुलाला मारले असेल, याचा काहीच अंदाज आला नसल्याचे प्रजापती यांच्या शेजारी रुसा जयस्वाल आणि सागर खरात यांनी सांगितले.  आपल्या पित्यानेच भावाला मारल्याचे सांगणाऱ्या गुड्डीचाही जबाब पोलिसांनी रविवारी नोंदवला.