शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

धक्कादायक! ओमायक्रॉनच्या दहशतीनं डॉक्टर बनला खूनी; स्वत:च्या कुटुंबालच संपवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 05:47 IST

ओमायक्रॉन विषाणूची दहशत घेतल्याचा डायरीत केला उल्लेख, नैराश्यातील डॉक्टरने पत्नी, मुलगा, मुलीची केली हत्या

कानपूर : कोविड-१९ चा नवा विषाणू ओमायक्रॉनने लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे. सामान्य लोकांना सोडाच रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरही या विषाणूला घाबरून आहेत. येथील सुशील कुमार मंधना या मेंदूच्या डॉक्टरला ओमायक्रॉन विषाणूच्या दहशतीमुळे नैराश्य आले. त्यातून त्यांनी त्यांची पत्नी, मुलगा व मुलीची हत्या केली व फरार झाले. हत्येच्या आधी डॉक्टरने मनात जे काही सुरू होते ते डायरीत लिहिले. डॉक्टरने त्याच्या भावाला शुक्रवारी सायंकाळी मेसेज पाठवून या हत्यांची माहिती दिली.

मंधना यांनी स्वत:ला कोविड फोबियाचा बळी सांगितले. त्यांनी डायरीत लिहिले की,“आता कोविड नाही. हा कोविड सगळ्यांना मारून टाकेल. आता मृतदेह नाही मोजायचे तर ओमायक्रॉन.” सुशील कुमार मंधना वैद्यकीय महाविद्यालयात फोरेन्सिक विभागाचे प्रमुख होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड रुग्णालयात मंधना यांनी कोविड रुग्णांना खूप जवळून तडफडत मरताना पाहिले होते. त्यांच्या वेदना व यातना त्यांच्या मनातून काही जात नव्हत्या. कोरोनाची दुसरी लाट थांबल्यापासून त्यांना नैराश्य आले होते.

डॉ. सुशील यांनी डायरी लिहिल्यानंतर सगळ्यांसाठी चहा बनवला. त्यात गुंगी आणणारी पावडर मिसळली. चहा पिल्यानंतर डॉक्टरची पत्नी चंद्रप्रभा (४८), मुलगा शिखर (१८) आणि मुलगी खुशी (१४) बेशुद्ध पडले, नंतर डॉक्टरने तिघांनाही वेगवेगळ्या खोल्यात नेले.डॉक्टरने अगदी सहज पत्नीला मारून टाकले. शिखर व खुशीचा गळा दाबला व फरार झाला. हत्या झाली त्या ठिकाणी रक्ताने माखलेला हातोडा आढळला. जाणकारांचे म्हणणे असे की, एक व्यक्ती तीन जणांची हत्या करू शकत नाही. हत्येच्या आधी तिघांनाही बेशुद्ध केले असावे. शवविच्छेदन अहवालातून सर्व खुलासा होईल.

माझा हलगर्जीपणाओमायक्रॉन विषाणू डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अनेक पटींनी धोकादायक असल्याचे डॉ. मंधना यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी हत्येच्या आधी डायरीत लिहिले की,“मी कोविडसंबंधित डिप्रेशन ‘फोबिया’त आहे. मी माझ्या हलगर्जीपणामुळे करिअरच्या अशा पायरीला अडकलो आहे की तेथून निघणे अशक्य आहे. मला काही भविष्य राहिलेले नाही. मी पूर्ण शुध्दीत आपल्या कुटुंबीयांना संपवून स्वत:लाही नष्ट करीत आहे. याला कुणीही जबाबदार नाही.”

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉन