शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी; संतप्त वकिलांकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 05:25 IST

न्यायालयातून पोलीस परत नेत असताना संतप्त वकिलांनी आरोपींना मारहाण केली. तसेच या वकिलांनी न्यायालयाच्या आवारात जमून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘कन्हैयालाल के हत्यारोंको फांसी दो’ अशा  घोषणा दिल्या.

उदयपूर : राजस्थानच्या उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल यांची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या चार आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

त्यांना न्यायालयातून पोलीस परत नेत असताना संतप्त वकिलांनी आरोपींना मारहाण केली. तसेच या वकिलांनी न्यायालयाच्या आवारात जमून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘कन्हैयालाल के हत्यारोंको फांसी दो’ अशा  घोषणा दिल्या. भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी विशिष्ट धर्माबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचे समर्थन करणारा मजकूर सोशल मीडियावर झळकविल्यामुळे टेलर कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली.  कन्हैयालाल हत्या प्रकरणात रियाझ अख्तरी व घौस मोहम्मद यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. 

या कटामध्ये सहभागी असलेल्या मोहसिन, आसिफ या आणखी दोन आरोपींना गुरुवारी रात्री अटक झाली होती. या चारही आरोपींना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयातून पोलीस परत नेत असताना संतप्त वकिलांनी त्यांना मारहाण केली. 

हत्येच्या समर्थकाला आसाममध्ये अटककन्हैयालाल यांच्या हत्येचे समर्थन समाजमाध्यमांवर करणाऱ्या व्यक्तीला आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यातून अटक करण्यात आली. समसूल लस्कर असे त्याचे नाव आहे. समसूलविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते मिलन दास यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

कन्हैयालाल यांच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत - भाजपकन्हैयालाल यांच्या कुटुंबीयांना जनतेने दिलेल्या निधीतून १ कोटी रुपयांची मदत देणार असल्याचे भाजप नेते कपिल मिश्रा यांनी जाहीर केले. मिश्रा यांनी कन्हैयालाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कन्हैयालाल कुटुंबीयांच्या मदतीसाठी जनतेने आतापर्यंत १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी दिला आहे.