शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ताे विश्वासू होता, म्हणून...; कांदिवली हत्याकांड रागाच्या भरात की पूर्वनियोजित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2022 06:52 IST

मालकिणीची हत्या, चालकाची चाैकशी

मुंबई : कांदिवली हत्याकांड हे रागाच्या भरात घडले की ते पूर्वनियोजित होते याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. त्यासाठी कुटुंबप्रमुख आशिष दळवी यांचा जबाब नोंदविण्यात येणार असून, त्यानंतरच या रहस्यमयी प्रकरणातील बरीच कोडी सुटण्यास मदत होणार आहे. मात्र पोलिसांना त्यांनी दिलेल्या माहितीत शिवदयाल सेन (६०) हा त्यांचा विश्वासू असल्यामुळे त्याला कुटुंबासोबत ठेवले होते असे म्हटले असून, सेनकडे सापडलेल्या सुसाईड नोटमधील मजकूर सध्या पडताळला जात आहे.

आशिष हे शुक्रवारी मुंबईत पोहोचले. पोलिसांना भेटल्यानंतर त्यांनी शताब्दी रुग्णालय गाठले. या घटनेमुळे त्यांना जबर धक्का बसला असून, याप्रकरणी सोमवारी पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी जबाब नोंदविल्याचे तपास अधिकारी म्हणाले. सेन माझा विश्वासू होता, म्हणून त्याला बायको, पोरांकडे ठेवले होते. गेली दहा वर्षे त्याने प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्याचे मुंबईत कोणीही नाही, अशी माहिती दळवी यांनी पोलिसांना दिली. 

घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहांची स्थिती आणि सुसाइड नोटवरून  किरण आणि मुस्कान यांची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर भूमी आणि सेन यांनी आत्महत्या केली, असा पोलिसांना विश्वास आहे. 

किरण आणि मुस्कानचा मृत्यू घटनास्थळावरून सापडलेल्या विळ्याने झालेल्या जखमांमुळे, तर भूमी आणि सेन यांचा मृत्यू श्वासोच्छ्वास थांबल्यामुळे झाला. गेली अनेक वर्षं बंद असल्याने या इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि आजूबाजूच्या कॅमेऱ्यांच्या मदतीने आत काय घडले हे तपासण्यात मदत होणार नाही. त्यानुसार इंदूर भेटीत काही संशयास्पद घडले का, याचा तपास सुरू आहे, असेही पोलिसांनी सांगितले.