शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Kanchana 3 Actress: कंचना 3 मधील रशियन अभिनेत्री अलेक्झांड्रा डिजावीची गोव्यात आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 12:26 IST

Alexandra Djavi Suicide: Alexandra सोबत तिचा बॉयफ्रेंडही राहत होता. त्याचा जबाब पोलिसांनी नोंदविला असून घटनेवेळी तो बाहेर गेला होता.

तामिळ सिनेमा कंचना 3 (kanchana 3 actress) मध्ये भूमिका केलेल्या 24 वर्षीय रशियन अभिनेत्रीने गोव्यात आत्महत्या केली आहे. अलेक्झांड्रा डिजावी (Alexandra Djavi) असे तिचे नाव असून ती राहत असलेल्या भाड्याच्या घरामध्ये अन्य एका तरुणीसोबत तिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. 20 ऑगस्टला तिचा मृतदेह सापडला होता. मात्र, सोमवारी तिची ओळख पटली. गोवा पोलिसांनी रशियाच्या दुतावासाशी संपर्क केला असून पोस्ट मार्टेमसाठी त्यांच्या परवानगीची वाट पाहत आहेत. (kanchana 3 actress Alexandra Djavi found dead in Goa.)

Alexandra सोबत तिचा बॉयफ्रेंडही राहत होता. त्याचा जबाब पोलिसांनी नोंदविला असून घटनेवेळी तो बाहेर गेला होता. तिचा मृत्यू हा गोव्याचे नाव अंतरराष्ट्रीय स्तरावरही खराब करणारा ठरला आहे. या अभिनेत्रीचा व आणखी एका महिलेचा २० ऑगस्ट रोजी गोव्यात ओशल येथे मृतदेह संशयास्पदरीत्या आढळले होते. या प्रकरणातील पोलीस तपासातून तरी सध्या यात काहीच घातपाताची शक्यता असल्याचा निष्कर्ष काढलेला नाही. परंतु तशी शक्यता नाकारताही येत नाही.

'ती' वेगळी...हणजूण मयत अलेझेंड्रा री डिजावी हिचा कोणत्याही विनयभंगाच्या तक्रारीशी काही संबंध नाही. तसेच तामिळनाडू पोलिसांनी संपर्क साधलेला नाही, अलेझेंड्रा ही मायदेशी असताना तिच्या नावाने कोणीतरी खोटी तक्रार २०१८ मध्ये दिली होती, अशी माहिती हणजूण पोलीस निरीक्षक सुरज गावस यांनी दिली. अलेझेंड्रा हिचा संबंध चित्रपट जगताशी असला तरी ती सध्या चित्रपटात काम न करता प्रमोशन करीत असे. मात्र, हल्ली तिच्याकडे काम नसल्याने ती मानसिक तणावाखाली होती. तिच्यावर मुंबईत उपचारही सुरू होते; पण कोरोनामुळे उपचाराकरिता तिला मुंबईला जाता आले नव्हते. चेन्नई येथे काम करताना तिच्या अपरोक्ष कोणीतरी तिच्या नावाचे साम्य असलेल्या युवतीने २०१८ मध्ये विनयभंगाची तक्रार केली होती. या अलेझेंड्राचा या तक्रारीचा काही संबंध नाही, अशी माहिती तिच्या प्रियकराने सांगितल्याचे निरीक्षक गावस यांनी सांगितले. तिने मानसिक तणावाने आत्महत्या केल्याचे लॅपटॉपवरील माहितीवरून निष्पन्न होते.

टॅग्स :goaगोवाrussiaरशिया