शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्ती न्यायासनावरून उठले; आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीदरम्यान गोंधळ अन् गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 15:37 IST

Aryan Khan Bail Hearing Updates : पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा NCBने केला आहे.

ठळक मुद्देकोर्टातील कर्मचा-यांनी सर्वांना बाहेर काढलं असून पंधरा मिनिटांच्या व्यत्ययानंतर मीडिया आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टात गोंधळ उडाला आहे. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले.

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर मुंबईउच्च न्यायालयात आज सुनावणी सुरु आहे. २० ऑक्टोबर रोजी विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नंतर या प्रकरणात आर्यनची न्यायालयीन कोठडी ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टात गोंधळ उडाला आहे. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले. कोर्टातील कर्मचा-यांनी सर्वांना बाहेर काढलं असून पंधरा मिनिटांच्या व्यत्ययानंतर मीडिया आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

आर्यनने मुंबई हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात तो प्रभाकर साईलला ओळखत नाही किंवा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. अलीकडे जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. आर्यन खानने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, हा एनसीबीचे अधिकारी आणि राजकीय लोकांमधील वाद आहे. मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कोणताही आरोप केलेला नाही असं म्हटलं आहे. NCB वर केलेल्या आरोपांशी आमचा संबंध; कोणताही पैशाचा व्यवहार झालेला नाही

पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा NCBने केला आहे. याच कारणामुळे हा जमीन नाकारला जाऊ शकतो. NCB ने आरोप केला आहे की, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांनी पंच साक्षीदारांवर प्रभाव टाकला आहे आणि Aryan Khan चा जामीन अर्ज केवळ याच आधारावर फेटाळला जाऊ शकतो.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbaiमुंबई