शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एआय तज्ज्ञांसाठी नोकऱ्याच नोकऱ्या; अभियंत्यांची तब्बल ५१ टक्के पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:47 IST

एआयच्या सुरक्षेवरून सुरु झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंची नुकतीच भेट घेतली.

बंगळुरू - 'ओपनएआय'च्या 'चॅटजीपीटी'च्या यशानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अॅप्लिकेशन्समध्ये तज्ज्ञ असलेल्या अभियंत्यांची मागणी जगभरात वाढली आहे. भारतात त्याचा परिणाम दिसू लागला आहे. देशातील एआय अभियंत्यांची ५१ टक्के पदे सध्या रिक्त आहेत.जगभरात एआय अभियंत्यांची जोरदार भरती केली जात आहे. आरोग्य, वित्त आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्याही एआय अभियंत्यांची भरती करीत आहेत. या संधीचा फायदा घेऊन एआय अभियंते सातत्याने नोकऱ्या बदलत आहेत. प्रत्येक नव्या नोकरीच्या वेळी त्यांना ३० ते ५० टक्के वेतनवाढ मिळत आहे. अनेक कंपन्या त्यांना दुप्पट वेतनवाढही देत आहेत.

... तर अभियंत्यांची पळवापळवी होणारबंगळुरुमध्ये डेटा सायन्स हब उभारणारी स्टार्ट-अप कंपनी फ्लेक्सकार च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बंगळुरुत डेटा इंजीनिअर्सची संख्या भरपूर असली ती पुरेशी नाही. शहरात लवकरच एआय क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंत्यांची पळवापळवी सुरू होऊ शकते.

२ लाख अभियंते हवेनासकॉमने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ४.१६ लाख एआय अभियंते आहेत. मात्र आणखी २.१३ लाख एआय अभियंत्यांची देशाला सद्यस्थितीत गरज आहे.

एआयवरून बायडेन यांनाही चिंताएआयच्या सुरक्षेवरून सुरु झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंची नुकतीच भेट घेतली. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, माइक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, ओपनएआयचे सॅम ऑल्टमन आणि अँथ्रोपिकचे डारियो अमोदी यांचा त्यात समावेश होता.. एआय तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी ते संपूर्णतः सुरक्षित आहे, याची कंपन्यांनी खात्री करावी, असे आवाहन बायडेन यांनी यावेळी केले.