शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

हॉटेलच्या रुममध्ये इंटिमेट करत होते कपल्स; बॉयफ्रेंडच्या मोबाईलवर एक कॉल आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 15:12 IST

कॉलेजमध्ये शिकताना तिची ओळख सहकारी अमित शर्मासोबत झाली. दोघांमध्ये मैत्री झाली, काही काळानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

जयपूर - ८ वर्षापासून रिलेशनमध्ये राहणाऱ्या युवतीला तिचा बॉयफ्रेंड जयपूरच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. याठिकाणी दोघांमध्ये शारिरीक संबंध सुरु होते. तितक्याच बॉयफ्रेंडला आलेल्या फोननं सगळी पोलखोल झाली. जिच्यासोबत ८ वर्ष रिलेशन ठेवलं, लग्न होईल या आशेने तिने बॉयफ्रेंडसोबत संबंधही ठेवले त्याच्या फोन आलेल्या एका कॉलनं तिच्या पायाखालची जमीन सरकली.

रात्री बॉयफ्रेंडच्या मोबाईलवर दिल्लीतील एका मुलीचा फोन आला जी स्वत:ला त्याची प्रेयसी असल्याचं सांगत होती. हे ऐकून गर्लफ्रेंडला धक्का बसला. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले त्याचे दिल्लीतील तरुणीसोबत लफडं असल्याचं तिला कळालं. जयपूरच्या एका हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर आता युवतीने तिच्या बॉयफ्रेंडवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गेली ८ वर्ष लग्नाचं आमिष दाखवून हरियाणात राहणाऱ्या अमितनं शारिरीक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जवाहर सर्कल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, मग...

जवाहर सर्कल पोलीस ठाण्यात उदयपूर येथील २६ वर्षीय युवती २०१३ मध्ये बीटेक करण्यासाठी जयपूरला आली होती. याठिकाणी कॉलेजमध्ये शिकताना तिची ओळख सहकारी अमित शर्मासोबत झाली. दोघांमध्ये मैत्री झाली, काही काळानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघं सातत्याने भेटीगाठी करु लागले. फोनवर संवाद झाले. एकमेकांच्या प्रेमात दोघंही मग्न झाले.

काही महिन्यांनी अमित शर्माने त्याच्या मित्राच्या घरी युवतीला घेऊन आला तेव्हा युवतीचं वय १७ वर्ष होतं. अमितनं कॉफीमध्ये नशेचं औषध मिसळत तिच्यासोबत बलात्कार केला. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा अमितनं तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिले. त्यानंतर २०१७ पर्यंत अमित तिच्यासोबत रिलेशनमध्ये होता. या काळात अनेकदा त्याने तिच्यासोबत शारिरीक संबंध बनवले. बीटेक पूर्ण झाल्यानंतर आरोपी नोकरीच्या बहाण्याने तिला घेऊन पुण्याला आला याठिकाणीही दोघांनी संबंध ठेवले.

पीडितेचा आरोप आहे की, २०२० मध्ये दोघंही आपापल्या घरुन काम करु लागले. त्यानंतर ११ नोव्हेंबर २०२१ ला दोघं कॉलेज डिग्री घेण्यासाठी जयपूरला आले. आरोपीने मेरिएट हॉटेलमध्ये रुम बुक केली. युवतीही त्याच्यासोबत तिथे राहण्यास आली. अमितने हॉटेलवर पुन्हा तिच्याशी संबंध ठेवले. त्या रात्री अमितच्या मोबाईलवर दिल्लीतील एका युवतीचा फोन खणाणला. हा कॉल अमितच्या दिल्लीतील प्रेयसीचा होता. पीडितेने अमितला याबाबत जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला. त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर धमकी देत पीडितेचे अश्लिल फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

तर दुसरीकडे या आरोपावर अमित म्हणाला की, गेल्या ७ वर्षापासून आमचे रिलेशन होते. मात्र दोन महिन्यापूर्वी युवतीला पुण्यातील एका फ्लॅटवर अन्य मुलासोबत पाहिले. त्यानंतर युवतीनेच मला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत वारंवार पैशाची मागणी करू लागल्याचा दावा केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.